नोरा फतेहीचा आज जर मुलगा असता, तर तो काहीसा असा असता... व्हिडिओ व्हायरल

पण त्याचा व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

Updated: Mar 8, 2022, 08:12 PM IST
 नोरा फतेहीचा आज जर मुलगा असता, तर तो काहीसा असा असता... व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही तिच्या डान्स स्टाईलसाठी विशेष ओळखली जाते. नोरा फतेहीच्या डान्सवर सगळेच फिदा आहेत. त्यात तिचा हाय गर्मी या गाण्यातील डान्स सर्वात जास्त चर्चेत होता. 

नोरा फतेही तिच्या स्टाईलसाठी देखील विशेष चर्चेत असते. ती सोशल मीडियावर देखील कमालीची चर्चेत असते. तिच्या बोल्डनेसमुळे ती सर्वात जास्त लक्षवेधून घेते. 

नोरा फतेही आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती तिच्या मुलामुळे.. आता तुम्ही म्हणालं की, नोराला मुलगा कधी झाला आणि आजपर्यंत हे कोणाला माहित कसं नाही?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एक लहान मुलगा ट्वर्क करताना दिसत आहे. नोरा फतेहीची फेमस स्टेप हा लहान मुलगा अगदी उत्तम रित्या करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला ही नोराची आपसुक आठवण येईल. कारण नोरा फतेहीची ही स्टेप खूप जास्त चर्चेत आली होती. 

नोरा सध्या जगप्रसिद्ध आहे. तिची चर्चा बॉलिवूड पासून हॉलिवूड पर्यंत आहे. आता नोरा फतेहीचा हा मुलगा असल्याचा एक व्हिडिओ खूप  व्हायरल होत आहे. अनेकांनी अशी चर्चा सुरु केली आहे. की हा नोराचा मुलगा आहे. कारण तो अगदी तिच्या प्रमाणे डान्स करताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नोराच्या डान्सप्रमाणे आता त्याच्या या व्हिडिओची तुफान चर्चा होत आहे. पण खरं तर हा नोराचा मुलगा नाही. हा मुलगा कोण आहे याबाबत अद्याप कोणतेही माहिती समोर आलेली नाही. पण त्याचा व्हिडिओ चांगलाच धुमाकूळ घालत आहे.