कतरिना कैफचं सासूबाईसोबत जमतं की नाही? हा फोटो सगळं काही सांगून जाणारा

दोघांचे वैयक्तिक आयुष्य आणखीनच चर्चेत आले.

Updated: Mar 8, 2022, 06:42 PM IST
  कतरिना कैफचं सासूबाईसोबत जमतं की नाही? हा फोटो सगळं काही सांगून जाणारा title=

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ डिसेंबर 2021 मध्ये विवाहबंधनात अडकले आणि दोघांचे वैयक्तिक आयुष्य आणखीनच चर्चेत आले.

पण खास गोष्ट म्हणजे कतरिनाची केवळ विक्कीसोबतच जबरदस्त बाँडिंग नाही, तर कतरिना विकी कौशलच्या संपूर्ण कुटुंबाच्या ती खूप जवळ आहे. कतरिनाचं सासूसोबत सर्वात सुंदर नातं आहे.

विकी कौशलची आई तिची सून कतरिना कैफवर जीव ओवाळून टाकते. तिला अगदी मुलीप्रमाणे वागवते. विकी कौशलने नुकताच महिला दिनानिमित्त सोशल मीडियावर एका गोड फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये तिची आई आणि पत्नी कतरिना दोघी दिसत आहेत. ज्याच्या कॅप्शनमध्ये विकीने लिहिले - माझी ताकद, माझे जग.

सासू-सुनेचं नातं या फोटोत स्पष्ट दिसतंय. कतरिना कैफ अनेकदा विकीच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. कतरिनाला जेव्हाही मुंबईत असताना कामातून वेळ मिळतो तेव्हा ती तिच्या सासूला भेटायला जाते.

त्याचवेळी महिला दिनानिमित्त कतरिना कैफनेही एक खास फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती बहिणींसोबत वेळ घालवताना दिसत आहे.