नोरा फतेही आणि टेरेन्स लुईससोबत जे झालं, ते कुणासोबतही होवू नये...कारण

अनेकदा अभिनेत्रींसोबत असं काही घडतं की त्या Oops Moment च्या शिकार ठरतात.

Updated: Dec 7, 2021, 08:41 PM IST
नोरा फतेही आणि टेरेन्स लुईससोबत जे झालं, ते कुणासोबतही होवू नये...कारण

मुंबई : अनेकदा अभिनेत्रींसोबत असं काही घडतं की त्या Oops Moment च्या शिकार ठरतात. कधी त्यांना ड्रेसमुळे Oops Moment ला सामोरं जावं लागतं, तर कधी शोमध्ये चुकीच्या ठिकाणी हात लागल्याने त्यांचा व्हिडिओ चर्चेत येतो. असाच काहीसा प्रकार नोरा फतेहीसोबत घडला आहे. काही दिवसांपूर्वी नोरा फतेही 'इंडियाज बेस्ट डान्सर' या रिएलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत होती. यावेळी टेरेंसने तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला होता. त्यावेळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. मात्र या व्हिडिओच्या मागची सत्यता आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

इंडियाज बेस्ट डान्सरचा आहे किस्सा
'इंडियाज बेस्ट डान्सर' या रिएलिटी शोमध्ये नोरा फतेहीसोबत ही घटना घडली होती. या शोमध्ये स्टेजवर अभिनेत्रीसोबत असं काही घडलं की लोकांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला. अभिनेत्रीला चुकीच्या ठिकाणी स्पर्श झाल्याची घटना या रिअॅलिटी शोच्या मंचावरच घडली होती.

टेरेन्स लुईसची जागा चुकीची होती
व्हिडिओमध्ये तुम्हालाही दिसेल की गीता कपूर, नोरा फतेही आणि टेरेन्स लुईस स्टेजवर दिसत आहेत. व्हिडिओमध्ये गीता कपूर समोर उभी आहे.  तिच्या मागे नोरा फतेही आणि टेरेन्स लुईस आहेत. हे तिघं हात प्रेक्षकांना वाकून नमस्कार करत आहेत. दरम्यान, टेरेन्स लुईसचा चुकून नोराच्या मागच्या बाजूला हात लागतो. असं या व्हिडोओत दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. मात्र या व्हिडिओवर नोरा आणि टेरेंसने आपलं मत व्यक्त करत सत्यता सांगितली.

नोराने व्हिडिओ मॉर्फ्ड केल्याचं सांगितलं
नोरा फतेही आणि टेरेन्स लुईस त्यावेळी 'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये जजच्या भूमिकेत दिसले होते. व्हिडिओ क्लिपमध्ये टेरेन्स आणि नोरा स्टेजवर उभे आहेत आणि त्यादरम्यान टेरेन्स प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी हात जोडतो पण नोराच्या शरीराच्या मागच्या बाजूला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केलाआहे.असं या व्हिडिओमध्ये दिसतंय.  या संदर्भात टेरेन्सने देखील एक पोस्ट शेअर  केली होती. ज्यामध्ये यावर त्यांनी थेट काहीही न बोलता एका स्टोरीतून आपली बाजू मांडली. त्याचबोरोबर नोराने, हा मॉर्फ्ड केलेला व्हिडिओ आणि फोटोशॉप केलेला फोटो असल्याचे सांगत  या प्रकरणावर टेरेन्सचे समर्थन केलं.