Fact Check : सलमान ऐश्वर्याचं किस कॅमेरात कैद; अनेक वर्षांनी Ex-Couple एकत्र?

एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या ऐश्वर्या आणि सलमान खानचा प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Jan 16, 2023, 01:45 PM IST
Fact Check : सलमान ऐश्वर्याचं किस कॅमेरात कैद; अनेक वर्षांनी Ex-Couple एकत्र? title=

मुंबई : बॉलिवूडची सर्वात सुंदर आणि सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन एका वेगळ्याच कारणामुळे ट्रोल होताना दिसत आहे. ऐशचा एक असा फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ऐशसोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खान दिसत आहे.

इतकंच नाही तर या फोटोमध्ये सलमान त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐशच्या गालावर किस करताना दिसत आहे. सलमान आणि ऐश आता एकमेकांपासून जरी आता वेगळे झाले असले तरी हा फोटो दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना विचार करायला लावणारा आहे. खरंतर हा मोठा प्रश्न आहे की, हा फोटो नेमका काढला कुणी?

आज आम्ही तुम्हाला या व्हायरल फोटोमागचं सत्य सांगणार आहोत. जो सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे.  हा फोटो एका चाहत्याने बनवलेला फोटो आहे. हा पूर्णपणे बनावट फोटो आहे. सध्या सोशल मीडियावर या फेक पिक्चरचा खूप गाजावाजा होत आहे.  खरंतर हा फोटो फोटोशॉप करण्यात आला आहे. 

सलमान आणि ऐशच्या नात्याची सुरुवात संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटादरम्यान झाली होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात असे बुडाले होते की दोघांनीही लग्न करण्याचं ठरवले होते. पण सलमानच्या एका चुकीने सगळं उद्ध्वस्त झालं.

सलमानने ऐशची फसवणूक केल्याचीही कबुली दिली आणि ती त्याच्यासोबत असतानाच आपले दुसऱ्या मुलीशी संबंध होते हे देखील त्याने कबूल केलं. त्यामुळे एशने हे नातं संपवणं चांगलं मानलं.  

याआधी शाहरुख खानच्या चलते चलते या चित्रपटात मुख्य भूमिकेत आधी राणी मुखर्जी नसून ऐश्वर्या राय होती. पण एके दिवशी ऐश आणि शाहरुख शूटिंग करत असताना सलमान तिथे आला आणि गोंधळ झाला. त्याच्या रागामुळे शाहरुखने ऐशला चित्रपटातून काढून टाकलं. सलमानच्या या वृत्तीने ऐशचा खूप अपमान झाला.

यानंतर  ऐश आणि अभिषेकने ढाई अक्षर प्रेम के, कुछ ना कहो, गुरु आणि उमराव जान या चित्रपटांमध्ये एकत्र काम दिसले होते. असं मानलं जातं की उमराव जानमध्ये एकत्र काम करताना त्यांच्यात जवळीक वाढली आणि टोरंटोमध्ये गुरुच्या प्रीमियरनंतर, अभिषेकने ऐशला प्रपोज केलं यानंतर ऐशनेही लगेच होकार दिला.

सेलिब्रेटी सोशल मीडियावर फोटोशॉपला बळी पडत असतात. केवळ सलमान ऐशच नाही तर अलीकडे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना या फोटोशॉपमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यातच यावेळी सलमान आणि ऐश्वर्या एका फोटोमुळे ट्रोल झाले. एकीकडे चाहत्यांना हा फोटो पाहून धक्का बसला असतानाच दुसरीकडे या कृत्याबद्दल अनेकजण संतापले आहेत.