करायला गेली एक झालं एक, प्रसिद्ध अभिनेत्रीला ओठांची सर्जरी करणं पडलं महागात

 अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या ओठांची सर्जरी करून घेतली आहे.

Updated: Jan 31, 2022, 10:07 PM IST
करायला गेली एक झालं एक, प्रसिद्ध अभिनेत्रीला ओठांची सर्जरी करणं पडलं महागात title=

मुंबई : अनेक अभिनेत्रींनी त्यांच्या ओठांची सर्जरी करून घेतली आहे. यामध्ये बॉलीवूडच्या अनेक बड्या हिरोइन्सचीही नावे आहेत. त्याचबरोबर, आता असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे ज्यामध्ये एक प्रसिद्ध अभिनेत्री अर्ध्या ओठांची शस्त्रक्रिया करून रस्त्यावर फिरत आहे. तिच्‍या ओठांची शस्‍त्रक्रिया का झाली नाही याचं कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

पाकिस्तानी अभिनेत्री हरीम शाम
ज्या अभिनेत्रीचा अर्धवट लिप सर्जरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तिचं नाव हरीम शाह आहे. हरीम ही पाकिस्तानची प्रसिद्ध टिक-टॉकर आहे.

एका कॉलने बिघडवला चेहरा
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हरीम शाहच्या एका बाजूचे ओठ सुजलेले दिसत आहेत. या अपूर्ण शस्त्रक्रियेची कहाणीही हरीमने ट्विटरवर सांगितली आहे. हरीमने ट्विटरवर एका पोस्टमध्ये लिहिलंय की,  'लिप फिलर सर्जरीसाठी क्लिनिकमध्ये गेले होते. मात्र पाकिस्तानच्या फोनमुळे त्यांना ही शस्त्रक्रिया अर्धवट सोडून बाहेर पडावं लागलं.

बँक अकाउंट झालय सीज
हरीम शाह यांनी सांगितलंय की, त्यांना फोन आला की FIA ने त्यांची सर्व बँक खाती सीज करण्याचे आदेश दिले आहेत. या कॉलमुळे हरीम शाहचा व्याप वाढला आणि तिने उपचार अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला.