Chalapathi Rao Death : काल छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'अली बाबा दास्तान-ए-कबुल' मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारणारी अभिनेत्री तुनिषा शर्मा नं (Tunisha Sharma) आत्महत्य केली. तर आज लगेच मनोरंजन विश्वातून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते चलपती राव (Chalapathi Rao) यांचे आज 25 डिसेंबर रोजी सकाळी निधन झाले. चलपती राव यांना हृदयविकाराच्या झटका आला होता. चलपती राव हे 78 वर्षांचे होते. त्यांचा अचानक मृत्यु झाल्यानं सगळ्यांनाच मोठा धक्काबसला आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
चलपती राव यांच्या निधनाची माहिती वामसी शेखर नावाच्या एका मीडिया पर्सनॅलिटीनं ट्विटरवर पोस्ट शेअर करत दिली आहे. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. चलपती हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ते आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चलपती यांच्या कुटुंबाच्या दु: खात असल्याचे म्हटले आहे. त्यासोबत त्यांनी चलपती यांच्या आत्म्याला शांती मिळो असे देखील म्हटले आहे. (Chalapathi Rao Death News)
Veteran actor Shri #ChalapathiRao (79) passed away due to cardiac arrest.
May his soul rest in peace pic.twitter.com/Y2JZNIw8xV
(@UrsVamsiShekar) December 25, 2022
चलपती हे गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटांमध्ये दिसत नव्हते. त्यामुळे त्यांनी अभिनयातून ब्रेक घेतल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होत्या. खरंतर चलपती हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. आरोग्याच्या समस्यांशी झुंज देण्यास ते अपयशी ठरले. चलपती आता आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसणार नसले तरी देखील अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हेही वाचा : आयुष्य संपवण्याआधी Tunisha Sharma नं शेअर केलेली शेवटची पोस्ट Viral
चलपती यांचा जन्म आंध्र प्रदेशात झाला होता. चलपती राव यांनी तेलुगू चित्रपटांमध्ये त्यांच्या कॉमेडी आणि खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जात होते. चलपती यांनी आता पर्यंत 600 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटांच्या यादीत बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या 'किक' हा चित्रपट देखील आहे.
यंदाच्या वर्षी अनेक सेलिब्रिटींचे निधन झाले आहे. त्यात लता मंगेशकर, बप्पी लहरी, पंडीत बिरजू महाराज, संध्या मुखर्जी, केके, सिद्धी मुसावाला, राजु श्रीवास्तव, अरुण बाली, रमेश देव, प्रवीण कुमार सोबती, दीप सिद्धू, रवी टंडन, भुपिंद्र सिंग या कलाकारांची नावं आहेत.