टिव्हीवरील संस्कारी बहूचा बोल्ड अंदाज; शेअर केला स्विमींग पूलमधील बिकीनी लुक

 या नव्या लुकमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसतोय. 

Updated: Sep 18, 2022, 09:39 PM IST
टिव्हीवरील संस्कारी बहूचा बोल्ड अंदाज; शेअर केला स्विमींग पूलमधील बिकीनी लुक title=

Devloeena Banerjee Photos: देवोलीना भट्टाचार्जीने 'गोपी बहू' (Goopi Bahu) या व्यक्तिरेखेने घराघरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. देवोलीनाच्या या अगदी साध्या व्यक्तिरेखेनंतर इंस्टाग्रामवर तिचा हा बोल्डनेस पाहून चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. नुकताच तिनं आपला नवा बोल्ड लुक शेअर केला आहे. या नव्या लुकमुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसतोय. (famous televsion actress shares bold photos netizens reacts see what they say)

देवोलियानं आपले बिकीनीतले फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या इन्टाग्रामवर तिनं आपले हे बोल्ड फोटो शेअर आहे. स्ट्राईप रेड बिकीनीमधील तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंवर तिचे चाहते नाना तऱ्हेच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. स्विमिंग पूलमधून बाहेर पडताना तिने बिकिनी घालून अशा स्टाईलीश पोज दिल्या आहेत की यावेळी सर्वांचे लक्ष तिच्याकडे लागले आहे.

या फोटोला आत्तापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे. देवोलिना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते आणि ती तिचा साधा आणि बोल्ड अवतार चाहत्यांसोबत शेअर करत असते. यामुळेच अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर 3 मिलियन लोक फॉलो करतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

देवोलिना जेव्हा 6 वर्षांची होती तेव्हा तिने शास्त्रीय संगीत शिकले. याशिवाय तो भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे. बिग बॉसमध्ये (Big Boss) प्रसिद्धी मिळवणाऱ्या देवोलीनाने आपल्या करिअरची सुरुवात प्रेक्षकांच्या आवडत्या शोमधून म्हणजे साथ निभाना साथियामधून (Saath Nibhana Saathiya) केली होती. या शोमध्ये तिने जिया मानेकच्या जागी गोपी बहूची भूमिका साकारली होती. 

साथ निभाना साथिया ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. आता हीच मालिका टेलिव्हिजनवर दुसऱ्या सिझनसह सुरू आहे, या दुसऱ्या सिझनलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळता आहे.