Mahakumbh 2025 : IAS ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहणारी 13 वर्षाच्या मुलीने साध्वी होणयाची इच्छा व्यक्त केली आहे. मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आई वडिलांनीच तिला महाकुंभ अखाड्यात आणून सोडले आहे. कुंभ मेळ्यात भक्तीचा अनोखा संमग पहायला मिळत आहे.
आग्रा येथील पेठा व्यावसायिक रोहतन सिंग यांचा मुलगा दिनेश सिंग हे कुटुंबासह महाकुंभला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी दिनेश यांची मुलगी राखीने साध्वी होण्याची व्यक्त केली. नववीत शिकणाऱ्या राखीने साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली. महाकुंभासाठी ती आग्राहून प्रयागराजला आली आहे. ती जुना आखाड्यात साध्वी बनली आहे. आखाड्याचे महंत कौशल गिरी यांनी राखीला वैदिक मंत्रोच्चारात आखाड्यात प्रवेश केला आणि तिचे नाव गौरी ठेवण्यात आले आहे. लवकरच तीचा दिक्षादान सोहळा पार पडणार आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या मेळाव्यावर HMPV विषाणूचं सावट आहे. त्यामुळे कुंभमेळ्यातल्या महंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलं आहे. चीनमधून येणा-या भाविक, नागरिक आणि पर्यटकांवर बंदी घालावी, अशी मागणी या पत्रातून त्यांनी मोदींकडे केली आहे. 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु होणार आहे.देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक इथे येणार असल्यानं, खबरदारीसाठी हे पत्र लिहिलं आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवार महाकुंभ 2025 चे आयोजन करण्यात आलेय. यावेळी ड्रोन व्हिज्युअल प्रयागराज शहर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळलेले आहे. महाकुंभमध्ये दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर योगी सरकार सतर्क झालंय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या सूचनेनुसार, डीजीपींनी प्रयागराजमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय. तर पोलिसांचा चोख बंदोबस्त ही तैनात ठेवण्यात आलाय.