अभिनेत्री दिशा पाटनी प्रेग्नंट? बेबी बंप पाहून सगळ्यांनाच धक्का 

 बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या नवीन फोटो आणि व्हिडिओने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते.

Updated: Apr 11, 2022, 04:27 PM IST
अभिनेत्री दिशा पाटनी प्रेग्नंट? बेबी बंप पाहून सगळ्यांनाच धक्का  title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या नवीन फोटो आणि व्हिडिओने सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. दिशाचे एकापेक्षा एक फोटो व्हायरल होत असतात. मात्र  दिशाचा यावेळी समोर आलेला फोटो चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे. दिशाचा हा फोटो पाहून तिचे चाहते नाराज होत आहेत आणि चिंता व्यक्त करत आहेत.

ओव्हर साइज टी-शर्टमध्ये दाखवला मोठा बंप आहे
समोर आलेल्या या ताज्या फोटोत, तुम्ही पाहू शकता की दिशाने एक ओव्हरसाईज टी-शर्ट परिधान केलं आहे आणि ती एक मोठा बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. दिशाचा हा फोटो पाहून पहिल्या नजरेत सर्वांचाच गोंधळ उडाला आहे. तिच्या टोन्ड फिगरचा बोलबाला असलेल्या दिशाचं हे काय झाले आहे असं चाहते म्हणत आहेत.  तसंच काही युजर्स ती प्रेग्नंट असल्याचंही म्हणत आहेत.  मात्र या सगळ्यानंतर आम्ही तुम्हाला या फोटोमागचं सत्य सांगणार आहोत. खरतरं, दिशाने ओव्हरसाईज टी-शर्ट परिधान केलं होतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फोटो व्हायरल
या ओव्हरसाईज टी-शर्टमध्ये अभिनेत्रीने मस्ती करता-करता एक टॉय ठेवला आहे. आणि यामुळेच चाहत्यांना अभिनेत्री प्रेग्नंट असल्याचं वाटत आहे.  तिची ही क्यूट स्टाईल सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे सगळे फॅन पेज तिचा हा फोटो शेअर करत आहेत तसंच सोशल मीडिया यूजर्सही कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.