ऐश्वर्याच्या लेकीचा बदलेला लूक पाहून चाहते हैराण

 ऐश्वर्या राय बच्चन आज जगभरात लोकप्रिय आहे.

Updated: Apr 4, 2022, 08:48 PM IST
ऐश्वर्याच्या लेकीचा बदलेला लूक पाहून चाहते हैराण title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आज जगभरात लोकप्रिय आहे. पण तिची मुलगी आराध्या बच्चनच्या लोकप्रियतेतही काही कमी नाही. आराध्या बच्चनशी संबंधित कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर येताच व्हायरल होतेच. याच क्रमात आराध्या बच्चनचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती तिची आई ऐश्वर्यासोबत दिसत आहे. हा व्हिडिओ Woopla च्या अधिकृत इन्स्टा पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चनही दिसत आहे. या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असल्याचंही पाहायला मिळत आहे.  

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिषेक बच्चन, आराध्या, ऐश्वर्या आणि त्यांची मैत्रिण आणि कोरिओग्राफर दिसत आहे. सुरुवातीला अभिषेक त्याच्या गाडी येण्याची वाट पाहत असल्याचं दिसतं. त्याचबरोबर ऐश्वर्या तिची मुलगी आराध्यासोबत कारमध्ये बसलेली दिसत आहे. ऐश्वर्या नेहमीच चर्चेत असते. मात्र यादरम्यान आराध्या बच्चनचा बदललेला लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडिओमध्ये आराध्या ऐश्वर्याच्या खांद्यापर्यंत दिसत आहे. ज्याला पाहिल्यानंतर काही यूजर्स आराध्या किती मोठी झाली असं म्हणताना दिसत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

नुकतंच बच्चन कुटुंब त्यांच्या मित्रांच्या घरी डिनरसाठी पोहोचलं होतं. तिथून हा व्हिडिओ समोर आला आहे. अलीकडेच आराध्या बच्चनचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता. ज्यामध्ये ती हिंदीमध्ये कविता वाचताना दिसत होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहत्यांना तिचं  कौतुक केलं होतं.