School Holidays list: जगभरात नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. प्रत्येकजण 2024 ला निरोप देण्यासाठी आणि 2025 च्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. नव्या वर्षात जीएसटीपासून ईपीएफओपर्यंत अनेक नवे बदल पाहायला मिळणार आहेत. अनेक निर्णयांचा सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. या सर्वात शालेय मुलांना त्यांच्या सुट्ट्यांसंदर्भात माहिती हवी असते. नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यात किती सुट्ट्या आहेत? असा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांना पडलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शाळांना सुट्टी देऊन नवीन वर्ष साजरे केले जाणार आहे. 1 जानेवारी 2025 रोजी अनेक कार्यालये बंद राहतील. शालेय आणि महाविद्यालयीन मुलांना वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2025 भरपूर सुट्ट्या मिळणार आहेत. 2025 वर्षाची सुरुवात उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये हिवाळी सुट्टीने होणार आहे.नववर्षाच्या स्वागताला अवघा दिवस उरला आहे. विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या सुट्टीचे कॅलेंडर तपासण्यास सुरुवात केली आहे. शालेय मुलांना जानेवारी 2025 मध्ये 15 हून अधिक सुट्या मिळणार आहेत. सध्या यूपी, दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मूसह अनेक राज्यांमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. बर्फवृष्टी आणि पावसामुळे थंडी वाढली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाही तापमानात घट नोंदवली जाईल. त्यामुळे हिवाळी सुट्ट्या वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यातील सणांप्रमाणे तिथल्या सुट्ट्या बदलतात. जानेवारी 2025 मध्ये किती दिवस शाळा बंद राहतील? याची माहिती घेऊया.
उत्तर भारतातील बहुतेक राज्यांतील सर्व शाळा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बंद राहतील. म्हणजेच 01 तारखेला शाळांना सुट्टी देऊन नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे. यूपी, दिल्ली, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये 15 जानेवारी 2025 पर्यंत हिवाळी सुट्टी असेल आणि शाळा 16 जानेवारीपासून सुरू होतील. राजस्थानमधील शाळा 5 जानेवारी (रविवार) पर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण थंडी असेल तर हिवाळी सुट्टी आणखी वाढू शकते.
हिवाळी सुट्टी व्यतिरिक्त जानेवारी 2025 मध्ये फक्त 2 दिवस सुट्टी असेल. गुरु गोविंद सिंग जयंती निमित्त 17 जानेवारी 2025, शुक्रवारी शाळा बंद राहतील. विद्यार्थी आणि ऑफिस व्यावसायिकांना हवे असल्यास, ते शुक्रवारची सुट्टी लाँग वीकेंड बनवू शकतात आणि 17, 18 आणि 19 जानेवारीला कुठेतरी प्रवास करण्याची योजना आखू शकतात. यानंतर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण देशभरात सुट्टी असेल. पण या दिवशी रविवार असल्याने त्याचा फारसा फायदा होणार नाही.