'माझ्या डिलिव्हरीनंतर शाहरुख रुग्णालयात आला अन्...', रुग्णालयात झालेल्या गोंधळाविषयी फराहनं केला खुलासा

Farah Khan-Shah Rukh Khan :  फराह खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या डिलिव्हरीनंतर जेव्हा शाहरुख तिला पाहण्यासाठी रुग्णालयात आला होता तेव्हा तिथे काय झाले होते याचा खुलासा तिनं केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Mar 27, 2024, 03:24 PM IST
'माझ्या डिलिव्हरीनंतर शाहरुख रुग्णालयात आला अन्...', रुग्णालयात झालेल्या गोंधळाविषयी फराहनं केला खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Farah Khan-Shah Rukh Khan : बॉलिवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कॉरिओग्राफर फराह खान ही नेहमीच तिचे मजेशीर किस्से सांगत चर्चेत येते. आता फराहनं तिच्या प्रेग्नंसी आणि शाहरुख संबंधीत एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. तिनं सांगितलं की जेव्हा तिची डिलिव्हरी झाली तेव्हा शाहरुख तिला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता आणि तिथे सगळ्यांचा गोंधळ सुरु झाला होता. फराहनं हे देखील सांगितलं की जेव्हा ती कन्सिव्ह करु शकत नव्हती तेव्हा ती शाहरुख जवळ रडली देखील होती.  फराह खाननं एका मुलाखतीत तिची प्रेग्नंसी, आयव्हीएफ टेकनॉलॉजी आणि तिच्या तिन्ही मुलांच्या डिलिव्हरी विषयी सांगितलं. 

फराहनं ही मुलाखत नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे. फराहनं यावेळी तिची डिलिव्हरीच्या दरम्यान तिच्यातील एनर्जी कमी झाली होती. त्याशिवाय तिच्या मुलांच्या जन्माची बातमी ऐकताच शाहरुख रुग्णालयात पोहोचला होता आणि त्यानंतर रुग्णालयात कसं वातावरण होतं ते देखील सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फराह म्हणाली की "15 वर्षांपूर्वी जेव्हा तिची डिलिव्हरी झाली त्यातही 3 मुलांना एकत्र जन्म देणार होती. तेव्हा त्या रुममध्ये 35 लोक होते त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता. शाहरुख त्याच दिवशी मला भेटायला आला आणि तिथे गर्दी झाली. सगळे रुग्ण आयवी ड्रिप लावून बाहेर आले होते आणि शाहरुख तिथेच मध्ये थांबला होता." 

कंसीव्ह करण्याविषयी सांगत फराह म्हणाली, एक दिवस जेव्हा ती ओम शांती ओमचं शूटिंग करत होती, तेव्हा लंच ब्रेकच्या दरम्यान, "मला डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की यावेळी देखील मी कन्सिव करु शकले नाही. या सगळ्यात, मला सांगितलं की शूटिंगची तयारी झाली त्यांनी बोलवताच मी आत गेले आणि शाहरुखला जाणवलं की काही गडबड आहे. कारण माझ्या चेहऱ्यावरुन कळत होतं की मी रडायला आले. त्यामुळे त्यानं सगळ्यांना ब्रेक घेण्यास सांगितलं आणि मला त्याच्या व्हॅनमध्ये घेऊन गेला. जिथे मी एक तास रडतच होते."

हेही वाचा : Vamika School: कोणत्या शाळेत जाणार वामिका? मुलीच्या प्रवेशासाठी परदेशातून मुंबईला येणार अनुष्का

फराहच्या लग्नाविषयी बोलायचे झाले तर 2004 मध्ये शिरीष कुंदरशी लग्न केलं. तर 2008 मध्ये फराहनं विट्रो फर्टिलाइजेशनच्या मदतीनं तीन मुलांना जन्म दिला. फराहनं 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मैं हूं ना' या चित्रपटातून एक दिग्दर्शिका म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटात शाहरुख खान, सुष्मिता सेन, सुनील शेट्टी, अमृता राव आणि जायद खान महत्त्वाच्या भूमिकेत होते. तर तिनं  'ओम शांति ओम' आणि 'हॅप्पी न्यू ईयर' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x