एफ बी पोस्ट लिहून फरहानचा ह्रतिकला पाठिंबा

 ह्रतिक आणि फरहान यांनी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'लक बाय चान्स' मध्ये एकत्र काम केले होते. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 9, 2017, 11:59 AM IST
 एफ बी पोस्ट लिहून फरहानचा ह्रतिकला पाठिंबा  title=

मुंबई : हृतिक रोशन आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्यात सुरू असलेल्या वादात अभिनेता फरहान अख्तर ह्रतिकच्या बाजून उभा राहिला आहे. त्या आपल्या फेसबुक पेज वरुन कोणाचेही नाव न लिहिता एक खुले पत्र लिहिले. ह्रतिक आणि फरहान यांनी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'लक बाय चान्स' मध्ये एकत्र काम केले होते. 

माध्यमांनी कशाप्रकारे ह्रतिक विरोधी भुमिका घेतली याबद्दल फरहानने भाष्य केले आहे. ह्रतिक सोबत पक्षपात झाला आहे. दोन्ही बाजू समोर आल्या तर खरी परिस्थिती कशी होती हे समजेल असे त्याने लिहिले आहे. "आज मी एका व्यक्तीने एका स्त्रीला लिहिलेली एक पत्र वाचले आहे. त्या व्यक्तीची माझ्याशी व्यावसायिक ओळख आहे. पहिल्यांदाच या व्यक्तिने आपली भुमिका जाहिर केली आहे. " ते म्हणाले, "त्यांच्या परिस्थितीनुसार योग्य किंवा चुकीचे काय हे ठरवण्याचा माझा हक्क नाही,हे सायबर अधिकाऱ्यांचे काम आहे, पण ज्या पद्धतीने घटनाक्रम समोर आले आहेत त्यावर भाष्य करणे गरजेचे आहे. समाजात महिला अनेकदा अन्यायाच्या शिकार होतात. काही प्रकरणात पुरुषांनाही या परिस्थितीतून जावे लागते. अशीही अनेक प्रकरणे समोर आली आहेत. 
यावर फरहान म्हणतो, ह्रतिकने आपला पर्सनल फोन आणि लॅपटॉप तपास अधिकाऱ्यांना दिला आहे. पण कंगनाने असे करण्यास विरोध केला. जो पर्यंत चौकशी अधिकाऱ्यांकडून किंवा कायदेशीररीत्या माहिती समोर येत नाही तोपर्यंत एकाद्याची बदनामी करणे टाळले पाहीजे असे त्याने सांगितले. आपण भेदभाव करता कामा नये.  फिल्ममेकर करण जोहर, अभिनेत्री यामी गौतम आणि सोनम कपूर फरफाहानच्या पोस्टशी सहमत झाले आहेत.