सिंधुदुर्गात साकारली 'झी मराठी'साठी अर्धा एकराची भव्य रांगोळी

झी मराठीकरता शेतात साकारली अनोखी रांगोळी 

Updated: Jul 11, 2020, 05:35 PM IST
सिंधुदुर्गात साकारली 'झी मराठी'साठी अर्धा एकराची भव्य रांगोळी

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे सध्या सगळीकडेच लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमध्ये सगळी काम थांबली असली तरीही शेतीची काम मात्र सुरू आहेत. सगळीकडे शेतात सध्या लावणी सुरू आहे. तीन महिन्यांनंतर मालिकेतील नवे एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. १३ जुलै रोजी 'झी मराठी' वरील मालिकांचे नवे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

लॉकडाऊनच्या या काळात नागरिकांना 'झी मराठी' ची खूप मोठी साथ होती. जुन्या मालिकांसोबतच वेगवेगळे कार्यक्रम 'झी मराठी' वर दाखविले जात होते. अनेक दिवसांनी कुटूंबाने एकत्र बसून टीव्ही पाहण्याचा आनंद घेतला. 'झी मराठी' वरील प्रत्येक मालिकेवर प्रेक्षकांच प्रेम आहे. कायमच 'झी मराठी'  प्रेक्षकांसाठी नवनवे कार्यक्रम घेऊन येत असते. 

प्रेक्षकांनी देखील 'झी मराठी' वर तेवढंच प्रेम केलं आहे. झी मराठीवर सध्या वेगवेगळ्या स्पर्धा सुरू आहेत. असं असताना सिंधुदुर्गातील कासार्डे गावातील शेतकरी अक्षय मेस्त्रीनेआपल्या स्वतःच्या अर्ध्या एकर (४०,००० sq. ft ) शेतात, 'झी मराठी'  आणि मराठी मनोरंजनाच्या शुभारंभानिमित्ताने एक भव्य रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी तो गणेशोत्सवापर्यंत आपल्या शेतात ठेवणार आहे. जेणेकरून जास्तीतजास्त लोक ही रांगोळी पाहू शकतात.

पावसाळ्यात शेतीच्या कामांना सुरूवात झाली. शेतीच्या कामासोबतच 'झी मराठी' ची कृतज्ञता या माध्यमातून अक्षय मेस्त्रीने व्यक्त केली आहे. भावभावनांच चित्रण आपल्याला वेगवेगळ्या मालिकेतून पाहायला मिळतं. आपण प्रत्येकजण मालिकेशी, मालिकेतील पात्राशी जोडले जातो. हीच भावना अक्षय मेस्त्री यांनी आपल्या कलाकृतीतून व्यक्त केली आहे.