अभिनेत्री फातिमा शेखच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पोस्ट शेअर करत दिली माहिती

बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. 

Updated: Jul 8, 2022, 06:49 PM IST
अभिनेत्री फातिमा शेखच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; पोस्ट शेअर करत दिली माहिती title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. लवकरच अभिनेत्री दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या आगामी 'साम बहादूर' या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं यांच्या भूमिकेत दिसणार असून त्यासाठी तिने आता तयारी सुरू केली आहे. हा चित्रपट भारतातील महान युद्ध नायक फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे.

सॅम मानेकशॉ हे 1971 मध्ये भारतीय लष्कराचे प्रमुख होते. जेव्हा भारताने बांगलादेशच्या मुक्तीसाठी आणि स्वातंत्र्यासाठी पाकिस्तानशी युद्ध केलं होतं. याबाबत माहिती देताना फातिमाने इन्स्टाग्रामवर मेघना गुलजारसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की, मी 'साम बहादूर'मधील माझ्या पात्राची तयारी सुरू केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या चित्रपटात अभिनेता विकी कौशल सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. सान्या मल्होत्रा ​​त्यांच्या पत्नी सिल्लोच्या भूमिकेत दिसणार आहे. मेघना गुलजार यांनी या चित्रपटाची स्क्रिप्टही लिहिली आहे. सध्या सॅम बहादूरची तयारी जोरात सुरू आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.