Drugs Case : प्रसिद्ध निर्मात्याच्या घरावर एनसीबीचा छापा

निर्मात्याच्या घरातून ड्रग्ससोबतच अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

Updated: Nov 8, 2020, 03:27 PM IST
Drugs Case : प्रसिद्ध निर्मात्याच्या घरावर एनसीबीचा छापा

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग्सचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरत आहे. आता या जाळ्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता  फिरोझ नाडियाडवाला देखील अडकला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  फिरोझ नाडियाडवालाच्या राहत्या घरी धाड टाकून ड्रग्ज जप्त केले आहेत. त्यामुळे एसीबी लवकरच त्याला चौकशीसाठी समन्स पाठवेल असं देखील सांगण्यात येत आहे. बॉलिवूडमधून ड्रग्स प्रकरणी येत असलेल्या नव्या नावांमुळे बॉलिवूडकरांना मोठा धक्का बसला आहे. 

दरम्यान एनसीबीने फिरोझच्या घरी धाड टाकली होती. एनसीबीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार  फिरोझच्या घरातून ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी एनसीबीनं आतापर्यंत पाच ड्रग डिलर्सना ताब्यात घेतलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून एनसीबीनं अनेक ड्रग्ज डिलर्सच्या घरी छापे मारून करवाई करण्यास सुरूवात केली. 

एनसीबीच्या सर्च ऑपरेशनमध्ये १० ग्रॉम गांजा, तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ड्रग्स प्रकरणी शनिवारी मुंबईतील अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. छापेमारी दरम्यान पाच ड्रग डिलर्सना ताब्यात घेतलं आहे. या ड्रग डिलर्सच्या चौकशीदरम्यान या मोठ्या निर्मात्याचं नाव समोर आल्याचं म्हटलं जात आहे.