मुंबई : बॉलिवूड अभिनेते गोविंदा आणि रवीना टंडन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. रवीना आणि गोविंदाने सिनेमात रोमँटिक बरोबरच अनेक सुपरहिट कॉमेडी चित्रपटही दिले आहेत. रवीना आणि गोविंदा या जोडीने राजाजी या चित्रपटात धुमाकूळ घातला होता. गोविंदाची राजाजी चित्रपटात अवस्था बिकट झाली जेव्हा या अभिनेत्याला लग्नानंतरची पहिली रात्र तबल्यात घालवावी लागली.
चित्रपटात गोविंदाची अवस्था तेव्हाच खराब होते जेव्हा त्याला कळतं की, त्याने श्रीमंत घराण्यातील मुलीशी लग्न केलं नाही तर एका नोकराच्या मुलीशी लग्न केलं आहे. यानंतर त्याला लग्नाची पहिली रात्र तबेल्यात घालवावी लागते. तिथे त्याला त्याच्या बायको रवीना टंडनसोबत म्हशींमध्ये बोलताही येत नाही. म्हैस गोविंदाच्या बिछान्याजवळची फुलंही खातात. बिचारा गोविंदा त्याची अवस्था पाहून रडू लागतो.
'राजाजी' चित्रपटातील गरीब गोविंदा सेठच्या घरी आमिर राजा बनून राहणार या विचाराने लग्न करतो. पण त्याच घरात तो झाडू मारु लागतो. गोविंदा चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये रवीना टंडन आणि तिच्या वडिलांचं हार्टब्रेक करतो. जेव्हा तो दारूच्या नशेत असतो. त्यानंतर संपूर्ण चित्रपटाच्या कथेला वळण मिळतं. तोच गोविंदा मस्ती आणि विनोद सोडून गंभीर व्यक्तिरेखेत दिसू लागतो. बरं, हा एका चित्रपटातील एक सीन होता. जो आजही गोविंदाच्या चाहत्यांना खूप आवडतो.