'हेरा फेरी', 'वेलकम' चित्रपट निर्मात्याला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

फिरोज नाडियाडवालाने २००९-१० सालचे टीडीएसचे ८.५६ लाख रुपये थकवले आहेत.

Updated: May 1, 2019, 11:06 AM IST
 'हेरा फेरी', 'वेलकम' चित्रपट निर्मात्याला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा title=

मुंबई : आर्थिक वर्ष २००९-१० मध्ये टीडीएसची ८.५६ कोटींची रक्कम भरण्यासाठी विलंब केल्यामुळे चित्रपट निर्माता फिरोज नाडियाडवालाला तीन महिने कठोर कारागृहाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य मेट्रोपोलियन मेजिस्ट्रेट आर.एस सरकाले यांनी नाडियाडवालाला आयकर कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा केल्याबद्दल दोषी ठरवलं आहे. या गुन्ह्यानुसार तीन महिन्यांच्या कारागृहाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

फिरोज नाडियाडवालाने २००९-१० सालचे टीडीएसचे ८.५६ लाख रुपये थकवले आहेत. 'हेरा फेरी', 'वेलकम', 'आवारा पागल दिवाना' यांसारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या नाडियाडवालाविरुद्ध एका आयकर अधिकाऱ्याने मार्च २०१४ साली तक्रार नोंदवण्यात आली होती. नाडियाडवालाने निर्धारित कालावधीत टीडीएसचे पैसे न दिल्याबाबत कोणतंही खरं कारण सांगितलं नसल्याचं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.