पहा कशी दिसते सोहा आणि कुणालची मुलगी

कुणाल खेमू आणि सोहा अली खानच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी एक चिमुकली आली आहे.

Updated: Oct 2, 2017, 06:49 PM IST
पहा कशी दिसते सोहा आणि कुणालची मुलगी  title=

मुंबई : कुणाल खेमू आणि सोहा अली खानच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वी एक चिमुकली आली आहे.

२९ सप्टेंबर म्हणजेच नवरात्रीच्या नवमीला कन्यारत्न  झाल्याने तिचे नावदेखील इनाया नॉमी खेमू  ठेवण्यात आले आहे. 

आज सोहा आणि इनायाला  हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली. हॉस्पिटलच्या आवारातच प्रसारमाध्यमांनी त्यांची छबी टिपली. सोहा आणि कुणालनेदेखील मिडीयाला साथ दिली. 

 

इनाया या नावाचा उर्दूमधील अर्थ अल्लाचे गिफ्ट असा होतो. तर तिचा जन्म नवमीला झाला असल्याने नॉमीचाही समावेश करण्यात आला आहे. कुणालच्या घरी आलेली नन्ही परी आणि येत्या काही दिवसातच त्याचा 'गोलमाल अगेन' रिलीज होणार असल्याने सध्या तो फारच खुशीत आहे.