'फोर मोर शॉट्स प्‍लीज!' सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

:'वीरे दी वेडिंग' नंतर आता 'फोर मोर शॉट्स प्‍लीज!' सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Updated: Jan 14, 2019, 01:22 PM IST
'फोर मोर शॉट्स प्‍लीज!' सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई:'वीरे दी वेडिंग' नंतर आता 'फोर मोर शॉट्स प्‍लीज!' सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तरुणींच्या जीवनावर आधारित ही सीरिज शहरी भागात राहणाऱ्या महिलांना कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो, समाजात असणाऱ्या रुढी, परंपरा, पुरुष प्रधान संस्कृती, घरच्यांकडून प्रत्येक गोष्टीसाठी होत असलेला विरोध, लादण्यात येणारे निर्बंध, अटी अशा अनेक गोष्टींचा सामना करत आनंदाने आपले जीवन जगणाऱ्या चौघींच्या आयुष्याच्या प्रवासाचा उत्तम दाखला आहे.अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने त्‍यांचा आगामी प्राइम ओरिजनल सीरिज 'फोर मोर शॉट्स प्‍लीज!'चा  ट्रेलर प्रदर्शित केलाय. ही सीरिज २५ जानेवारी २०१९ पासून पाहायला मिळणार आहे. 'फोर मोर शॉट्स प्‍लीज!' या सीरिजची रचना रंगिता प्रीतिश नंदी यांनी केली असून, अनु मेननने दिग्‍दर्शन केले आहे. या सीरिजची निर्मिती प्रितिश नंदी कम्‍युनिकेशन्‍सने केली आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

​Nama-slay, this is what you came for! FourMoreShotsPlease, streaming from 25th January on primevideoin | Full trailer link in bio

A post shared by Four More Shots Please (@4moreshotspls) on

दिग्‍दर्शक अनु मेनन म्‍हणाली," मी पटकथा वाचली तेव्हापासूनच फोर मोर शॉट्स प्‍लीज!'च्‍या रिलीजबाबत उत्कंटा अधिक वाढत गेली. ही सीरिज अतिशय चांगली आहे. भारतात आधुनिक विचारसरणीच्या महिलांच्‍या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. अशा महिलांच्या जीवनाचे चित्रण या वेबसीरिजमधून दिसणार असल्यामुळे ते तुमच्‍या मनाला स्‍पर्श करेल.''प्राइम ओरिजनल सीरिज 'फोर मोर शॉट्स प्‍लीजमध्ये सयानी गुप्‍ता, किर्ती कुल्‍हारी, बानी जे आणि मानवी गगरू या चार महिलांचं पात्र साकारणार आहेत. प्रतिक बब्‍बर, नील भूपालम, लिसा रे, मिलिंद सोमण, अमृता पुरी आणि सपना पब्‍बी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.