Gadar 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर Gadar 2 चा हातोडा; दोन दिवसात कमवले तब्बल 'इतके' कोटी!

Gadar 2 Box Office Collection Day 2: पहिल्या दिवशी दणक्यात सुरूवात केल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी देखील गदर 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. गदर 2 सिनेमाने आत्तापर्यंत 83.18 कोटींचा गल्ला जमावला. 

Updated: Aug 13, 2023, 04:54 PM IST
Gadar 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर Gadar 2 चा हातोडा; दोन दिवसात कमवले तब्बल 'इतके' कोटी! title=
Gadar 2 Box Office Collection Day 2

Gadar 2 Box Office Collection Day 2: सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेलचा (Amisha Patel) बहुचर्चित राहिलेल्या गदर या चित्रपटाचा सिक्वेल आता समोर आला आहे. 11 ऑगस्ट रोजी गदर 2 सिनेमाने दमदार कमाई केल्याचं दिसून येतंय. गदर: एक प्रेम कथा हा सिनेमा 2001 मध्ये आला होता. त्यानंतर आता 22 वर्षानंतर या सिनेमाच्या सिक्वेलने धमाका केलाय. 'गदर 2' आणि 'OMG 2' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले. त्यामुळे कोणता चित्रपटा हिट ठरणार आणि कोणता बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष होतं. अशातच आता गदर 2 सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.

पहिल्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये गदर 2 ने बाजी मारली होती तर आता दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचे आकडे देखील समोर आले आहेत. गदर 2 चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्यात दिवशी 40  ते 45 करोड रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी देखील गदर 2 ने 40 कोटींची कमाई केल्याचं समोर येत आहे. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, दोन दिवसात सिनेमाने 83.18 कोटींची गल्ला जमवला आहे. 

कसा आहे Gadar 2?

फुल टू अॅक्शन अन् सनी भाईचा धमाका...जिथं पिच्चर संपतो, तिथूच सुरू होते, गदर टू ची कहाणी... पाकिस्तानमधून भारतात येताना जो बापाला रेल्वे इंजिनमध्ये कोळला भरू लागणारा जित्ते आता मोठा झालाय. त्याला लागलंय अॅक्टिंगचं याड...पण भारत पाकिस्तानमध्ये खडाजंगी होते अन् असं काही होतं की... पुन्हा सिनेमात होते पाकिस्तानची एन्ट्री. हिंदुस्तान जिंदाबाद अन् तोच हॅडपम्प, पण यावेळा हॅडपम्प नाही तर सनीभाई वेगळंच काहीतरी उचलतो. जुन्या आठवणी ताज्या करणारा हा सिनेमा नक्की पहावा, असा आहे.

पाहा व्हिडीओ

दरम्यान,  सनी देओलने तारा सिंहची भूमिका साकारली तर अमिषा पटेलने सकिनाची भूमिका साकारली. त्याचबरोबर लव्ह सिन्हा,उत्कर्ष शर्मा, सिमरित कौर या कलाकारांनी देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. जॅकी श्रॉफ, बॉबी देओल, राजवीर देओल यांनी गदर-2 चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती.