'आत्महत्येपूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार', आकांक्षा दुबेच्या आईचा दावा

Akanksha Dubey : आकांक्षा दुबेनं मार्च महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्याचं संपूर्ण प्रकरण आता समोर आलं असून त्यावर चर्चा सुरु आहे.

दिक्षा पाटील | Updated: Oct 11, 2023, 02:07 PM IST
'आत्महत्येपूर्वी माझ्या मुलीवर बलात्कार', आकांक्षा दुबेच्या आईचा दावा title=
(Photo Credit : Social Media)

Akanksha Dubey : लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं मार्च महिन्यात गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी पंजाबी गायक समर सिंहला ताब्यात घेतलं होतं. त्यावेळी आकांक्षाच्या आईनं समरवर गंभीर आरोप केले होते. या सगळ्यात आता अशी माहिती समोर आली आहे की आकांक्षानं आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. मात्र, असा संशय असल्याचे याचिकेत दाखल करण्यात आले होते. 

आकांक्षानं अचानक आत्महत्या का केली असा प्रश्न तिच्या सगळ्या चाहत्यांसमोर उभा राहिला होता. तिच्या निधनानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयात सीबीआय तपासाची मागणी करण्यात आली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. आकांक्षाच्या निधनानंतर तिच्या आईनं एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत जाहिर करण्यात आले होते, त्यात असे म्हटले होते की आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा त्यांना संशय आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कुठे झाला आकांक्षाचा मृत्यू

आकांक्षा शूटिंगसाठी वाराणसीला गेली होती. तिथल्या एका हॉटेलमध्ये आकांक्षानं गळफास घेत आयुष्य संपवलं. तिच्या निधनानंतर तिच्या आईनं आरोप केला आहे की समर सिंहनं तिला ब्लॅकमेल करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं.  

आकांक्षा आणि समर सिंह होते रिलेशनशिपमध्ये! 

आकांक्षा आणि समर सिंग हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आकांक्षा आणि समर हे तीन वर्षांपूर्वीच भेटले होते. त्या दोघांची जोडी ही टिकटॉक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आकांक्षाचे तर सोशल मीडियावर लाखो चाहते होते. तिनं जर सोशल मीडिया फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला की त्याला लाखो लोक लाईक करायचे. आकांक्षानं वयाच्या 17 व्या वर्षी तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिनं 'वीरों के वीर' आणि 'कसम पैदा करने वाले की 2' अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

हेही वाचा : अभिनेता आफताब शिवदासानी सायबर क्राईमचा शिकार, एका लिंकवर क्लिक केलं आणि गमावली 'इतकी' रक्कम

आकांक्षा सोशल मीडिया स्टार

आकांक्षाचे इन्स्टाग्रामवर 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत.तर तिचे टिक-टॉकवर देखील असेच लाखो चाहते होते. खरंतर आकांक्षाला एक सोशल मीडिया स्टार म्हणूनच ओळख मिळाली होती.