मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

गौरी खाननं 'कॉफी विथ करण'मध्ये हा खुलासा केला आहे. 

Updated: Sep 22, 2022, 11:23 AM IST
मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी (Shah Rukh Khan) गौरी खाननं (Gauri Khan) नुकतीच दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण' (Koffee With Karan) या शोमध्ये 17 वर्षांनंतर हजेरी लावली होती. यावेळी गौरीसोबत तिच्या मैत्रिणी भावना पांडे आणि महीप कपूर यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी गौरी पहिल्यांदा मुलगा आर्यन खानच्या अटकेवर (Aryan Khan Arrest) बोलली आहे. 

आणखी वाचा : 'अनन्या आणि कार्तिक एकत्र...', Ananya च्या आईचा मोठा खुलासा

यावेळी करण गौरीला म्हणाला, तो काळ शाहरुखसाठी खूप कठीण होता. केवळ व्यावसायिकच नाही तर वैयक्तिकरित्याही जे काही घडले. तुला एक आई म्हणून आणि शाहरुखला एक वडील म्हणून मी ओळखतो. आपण एक कुटुंब आहोत. हे सगळं काही सोपे नव्हतं. पण, या परिस्थितीला कशा प्रकारे सांभाळलंस? 

आणखी वाचा : 'चित्रपटाचं नाव इंद्रधनुष्य...', ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्यानं Brahmastra ची उडवली खिल्ली

करणच्या प्रश्नावर उत्तर देत गौरी म्हणाली, 'होय, एक कुटुंब म्हणून आम्ही सगळे कठीण काळातून गेलो, त्यापेक्षा वाईट काहीही नसू शकतं. जे घडलं ते एक आई आणि पालक म्हणून बघनं यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. प्रत्येकव्यक्ती आमच्यावर प्रेम करतो. आमचे मित्र आणि त्यांच्याशिवाय ज्या लोकांना आम्ही ओळखत नाही त्या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला. इतकं प्रेम आणि आशीर्वाद मिळाल्याने आम्ही धन्य आहोत. या काळात ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांची मी नेहमीच आभारी आहे.’ (Gauri Khan Opens About Son Aryan Khan Drugs Case Arrest Says Nothing Can Be Worse) 

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आणखी वाचा : तरुणींना युवकांकडून गरम रॉडनं बेदम मारहाण, म्हणाले 'करत होत्या अश्लील...'

आर्यनला ड्रग्ज (Aryan Khan Druga Case) प्रकरणात अटक केल्यानंतर त्याला कोठडीत ठेवण्यात आले होते. यादरम्यान त्याची रवानगी आर्थर रोड कारागृहातही करण्यात आली होती. शाहरुख तुरुंगात आपल्या मुलाला भेटायला गेला होता. आर्यन 30 ऑक्टोबरला तुरुंगातून घरी परतला. या प्रकरणात एनसीबीला आर्यनविरुद्ध ठोस पुरावे न मिळाल्याने त्याची या प्रकरणातून सुटका झाली.