Viral Video : लावणी हा महाराष्ट्रातील लोककलाकृती आहे. तमाशाचा एक भाग म्हणजे लावणी हे नृत्य. लवण म्हणजे सुंदर आणि या शब्दावरुनच आला लावणी. हे नृत्य श्रृंगार आणि भक्तीशी जोडलं गेलं आहे. गीत, नृत्य आणि अदाकारी यांचं त्रिवेणी संगम म्हणजे लावणी. महाराष्ट्रात लोकसंस्कृतीत लावणीला अतिशय महत्त्व आहे. राज्यात नावाजलेल्या लावणीवती आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात गौतमी पाटील हिची लावणी पाहून महाराष्ट्राला वेड लागलं आहे. (Gautami Patil competes with this new Lavanyavati aish jadhav Who is the best video viral )
तरदुसरीकडे गौतमी पाटील हिचं नृत्य हे लावणी नसून अश्लील डान्स असल्याची टीका तिच्यावर वारंवार झाली आहे. अशातच सोशल मीडियावर नव्या लावण्यवती एन्ट्री झाली आहे. या लावण्यवतीचं नृत्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
हीच खरी महाराष्ट्राची लावणी आणि ही खरी लावण्यवती अशी तिचं कौतुक होतं आहे. कशी मग आदा भावा यावरील लावणी व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरतोय. या व्हिडीओमधील लावण्यवती ही पोपटी नऊवारी नेसून नृत्य करताना दिसत आहे. तिचं सौंदर्य आणि हावभाव पाहून महाराष्ट्राचा मान हीने वाढविला आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील aish_jadhav या नावाने या महिलेच अकाऊंट असून त्यावर तिचे अनेक लावणी करतानाचे व्हिडीओ आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी गौतम पाटीलची आठवण काढत आहे.
कोणी तिला या लावण्यवतीचा व्हिडीओ दाखवा असं म्हणत आहे. तर कोणी म्हणत आहे की, ही लावण्यवती गौतमी पाटीलचं मार्केट खाणार आहे.
सुरेखा पुणेकर यांच्या नंतर हिच लावणी सम्राज्ञी होणार अशी कंमेटही एका नेटकरीने केली आहे. सध्या हिचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जात आहेत. आता तुम्हीच सांगा गौतमी पाटील बेस्ट की ही नवीन लावण्यवती अव्वल? सबसे कातील कोण गौतमी की नवीन लावण्यवती जाधव?