Gautami Patil Video Viral: गौतमी पाटीलचा गुपचूप काढलेला 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल!

Gautami Patil Video Viral : गौतमी पाटील या नावाने सध्या महाराष्ट्रातील तरुणांना वेड लावलंय. नृत्यांगणा गौतमी पाटीलचे (Gautami Patil Video) सर्वच कार्यक्रमांना एकच गर्दी असते. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई वाटेल ते करायला तयार असते. मात्र याच गौतमी पाटीलसोबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Updated: Feb 27, 2023, 11:31 AM IST
Gautami Patil Video Viral: गौतमी पाटीलचा गुपचूप काढलेला 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल! title=

Gautami Patil Video Viral : महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील (Gautami Patil Video) पुन्हा एकदा लावणीमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. तिच्या लावणीवर अनेकजण फिदा असतात. मात्र तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. असाच एक प्रकार पुन्हा घडला असून पुण्यात रिलस्टार गौतमी पाटीलच्या (Gautami Patil Dance Video) बदनामीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

पुण्यातील एका स्टेजशो दरम्यान कपडे बदलताना गौतमीचे (Gautami Patil Video Viral) अश्लिल व्हिडीओ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असताना गौतमी पाटीलची लोकप्रियता वाढता असताना तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गौतमी पाटीलकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

वाचा : नवीन तारक मेहता अडकला लग्नबंधनात, सचिन श्रॉफची होणारी पत्नी कोण आहे? 

गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडीओ व्हायरल होतातच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला. यावेळी एका नेटकऱ्यांनी प्रतिक्रीया दिली की, ती चूकीचा डान्स करत होते हे नक्की खरं आहे पण त्यावर तिच्यावर बंदी घालण्यात यावी. पण आज त्या गौतमी पाटील यांच्यावर नक्कीच अन्याय झाला आहे आणि पोलिस अधिकारी, सरकार नक्कीच या गुन्हेगारला शोधून काढतील...\

मुलाच्या वाढदिवसाला गौतमीचा कार्यक्रम

पाच वर्षांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्ताने त्याच्या वडिलाने चक्क गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी या कार्यक्रमामध्ये महिलांची तुफान गर्दी झाली होती. साताऱ्यातील चेतन शिंदे यांनी मुलगा मल्हारच्या वाढदिवसानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. गौतमीने मल्हारला केक भरवत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली. यावेळी सबसे कातील, गौतमी पाटील...असं डॉयलॉगच मल्हारने म्हणून दाखवला. मल्हारचा डॉयलॉग ऐकून गौतमीही भारावून गेली.