Kangana Ranaut च्या निशाण्यावर आता अक्षय कुमार म्हणाली, 'फ्लॉप...'

Kangana Ranaut ची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कंगनानं यावेळी अक्षय कुमारवर निशाणा साधला आहे. मात्र, तिला कोणत्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं हे सांगितलं आहे. 

Updated: Feb 26, 2023, 01:27 PM IST
Kangana Ranaut च्या निशाण्यावर आता अक्षय कुमार म्हणाली, 'फ्लॉप...' title=

Kangana Ranaut On Selfiee Movie: बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कंगना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. देशातल राजकारण असो किंवा बॉलिवूडचे मुद्दे, कंगना प्रत्येक बाबतीत आपले विचार अगदी स्पष्टपणे मांडत असते. दरम्यान, कंगनानं या वेळी बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाश्मी (Emraan Hashmi) यांच्या 'सेल्फी' (Selfiee) या चित्रपटावर वक्तव्य केलं आहे. कंगनानं सोशल मीडिया एक पोस्ट शेअर करत चित्रपटावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरी वरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगना म्हणाली की 'करण जोहरच्या सेल्फी चित्रपटानं पहिल्या दिवशी कसेबसे 10 लाख रुपयांची कमाई केली असं मला कळलं. या चित्रपटावर मीडियातील एखाद्या व्यक्तीनं किंवा मग कोणी ज्या प्रकारे मला ट्रोल करतात किंवा काही बोलल्याचं मी पाहिलं नाही.' 

Kangana Ranaut on Akshay Kumar s Selfiee movie flop

पुढे कंगनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंगनानं एक आर्टिकल शेअर केलं आहे. अक्षयला कंगनाचं मेल व्हर्जन म्हटलं होतं. अक्षयचा सेल्फी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही म्हणून नेटकऱ्यांनी त्यावर अशी प्रतिक्रिया दिली. हा त्याचा 6 वा चित्रपट फ्लॉप झाला वाटतं. या आर्टिकलवर प्रतिक्रिया देत कंगना म्हणाली, 'मी सेल्फी फ्लॉप झाला असं सांगणारी बातमी शोधत होती. त्याजागी सगळ्या बातम्या या माझ्याविषयीच होत्या. ये भी मेरी ही गलती है. वाह भाई करण जोहर वाह.'

हेही वाचा : HCA अवॉर्डमध्ये अभिनेत्रीनं स्तुती करताच लााजला Ram Charan म्हणाला, 'मी क्यू विसरलो...'

Kangana Ranaut on Akshay Kumar s Selfiee movie flop

दरम्यान, मीडिया रिपोर्ट्सनुसार सेल्फीनं पहिल्या दिवशी तीन कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट एकूण 150 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. ‘ड्रायव्हिंग लायसेन्स’ या मल्याळम चित्रपटाचा हा रिमेक आहे. अक्षय कुमारच्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही करण्यात आलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करेल, अशी अपेक्षा सगळ्यांना होती. ‘सेल्फी’ चित्रपटात अक्षय कुमार व इमरान हाश्मीसह नुसरत भारुचा (Nushrratt Bharuccha) व डायना पेंटी (Diana Penty) यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत