हरभजन सिंहशी लग्न केल्यानंतर 'या' कारणासाठी गीता बसराने सोडलं अभिनय करिअर

गिता बरसा हे 10 वर्षे केलं काम 

Updated: Apr 15, 2021, 06:20 PM IST
हरभजन सिंहशी लग्न केल्यानंतर 'या' कारणासाठी गीता बसराने सोडलं अभिनय करिअर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा दुसऱ्यांदा गरोदर आहे. जुलै महिन्यात ती आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. यावेळी गीताने आपल्या करिअरमधील ब्रेक बाबत सांगितलं आहे. (Geeta Basra reveals why she took a step back from acting after marrying Harbhajan Singh) तिने एका मुलाखतीत, क्रिकेटर हरभजन सिंहशी लग्न केल्यानंतर सिनेमांपासून का दूर गेली याची माहिती दिली आहे. 

गीताने सांगितलं की,'माझी आई वर्किंग होती. तिने आमच्या संपूर्ण कुटुंबाला सांभाळलं. आज माझ्याकडे जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. मी कायम आईकडून प्रेरणा घेत असते. म्हणून मला वाटतं महिलांनी कधीच आपलं कोणतंच पॅशन थांबवू नये.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

गीताने पुढे सांगितलं की,'आई होण्यासारखं सुंदर सुख नाही. मी माझी मुलगी हिनायासोबत घालवलेला प्रत्येक क्षण एन्जॉय करत आहे. मी काम करत नाही ही माझी अगदी खासगी निवड होती. मी आईपण एन्जॉय करत होते. आणि ही वेळ खूप आनंद देणारी आहे. मी माझ्या मुलीच्या प्रत्येक गोष्टी एन्जॉय करत आहे. मला हे क्षण गमवायचे नव्हते. आणि हा माझा सर्वस्वी निर्णय होता.'

2006 मध्ये केली अभिनयाला सुरूवात 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

गीता बसराने 2006 साली 'दिल दिया है' पासून करिअरला सुरूवात केली. बॉलिवूडमध्ये तिला जास्त यश नाही मिळालं. 2006 ते 2016 मध्ये गीताने फक्त 7 सिनेमे केले. ज्यामध्ये एक पंजाबी आणि 2015 मध्ये बॉलिवूड. जो 'सेकंड हँड हसबंड' हा सिनेमा तिला फ्लॉप झाला. 

2015 मध्ये केलं लग्न 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Geeta Basra (@geetabasra)

गीता आणि हरभजनने खू दिवस डेट केल्यानंतर 2015 मध्ये लग्न केलं. 29 ऑक्टोबर 2015 साली दोघांचं लग्न झालं. जुलै 2016 मध्ये गीताने आपल्या पहिल्या मुलीला लंडनमध्ये जन्म दिला. गीताचं संपूर्ण कुटुंब लंडनमध्ये राहतं.