Deepika padukone नं बहिणीच्याच होणाऱ्या नवऱ्यासोबत... ; वाईट फसली अभिनेत्री

ही गुंतागुंत आपल्या परीनं सोडवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला

Updated: Jan 20, 2022, 04:19 PM IST
Deepika padukone नं बहिणीच्याच होणाऱ्या नवऱ्यासोबत... ; वाईट फसली अभिनेत्री  title=

मुंबई : नात्यांचा मुद्दा आला की तिथे ओघाओघानं गुंतागुंतही आलीच. नात्यांमधली गुंतागुंत कोणालाच चुकलेली नाही. पण, ज्यानंत्यानं ही गुंतागुंत आपल्या परीनं सोडवण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. ज्यांना हे नाही जमलं, ते मात्र वाईट अडकले. 

नात्यांच्या निर्माण झालेल्या याच भोवऱ्यात पुरती फसली अभिनेत्री दीपिका पदुकोण. आपल्या बहिणीच्याच होणाऱ्या पतीसोबत तिची वाढती जवळीक तिसऱ्याच नात्याला वाचा फोडून गेली. (Deepika Padukone)

सध्या सोशल मीडियावर याचाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे दीपिकासोबत काय घडलंय याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

हा व्हायरल होणारा व्हिडीओ आहे, तिच्या आगामी चित्रपटाचा, 'गहराईयाँ'चा (gehraiyaan ). 

शकुन बत्रा दिग्दर्शित या चित्रपटाच्या टीझरनं एकच धुमाकूळ घातलेला असताना आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. 

अनन्या पांजे, दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी, नसिरुद्दीन शाह, धैर्य करवा यांच्या भूमिकांची झलक या ट्रेलरमध्ये पाहता येत आहे. 

सिद्धांत आणि दीपिकाची केमिस्ट्री आणि नात्यांचा गुंतलेला धागा या साऱ्याची झलक यातून पाहता येत आहे. 

एका दमदार कथानकाला या चित्रपटाच्या निमित्तानं मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केल्याचं पाहायला मिळतं. 

दीपिका आणि सिद्धांत अलिबागला जातानाचे काही फोटो बऱ्याच दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते, हा ट्रेलर पाहताना त्या दृश्यांची जोड लावल्यास ते याच प्रोजेक्टसाठी गेले असावेत याचा अंदाज बांधता येतो. 

11 फेब्रुवारीला Amazon prime video वर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेव्हा नात्यांची ही गुंतागुंत पाहण्यासाठी तुम्ही सज्ज आहात ना?