मुंबई : बॉलिवूडमध्ये काम केलेल्या आणखी एका अभिनेत्याचा आज मृत्यू झाला आहे, ज्यामुळे संपूर्ण सिनेमा विश्वात शोककळा पसरली आहे. या अभिनेत्याने अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान आणि संजय दत्त सारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केला आहे. या अभिनेत्याचे नाव आहे अरुण वर्मा. अभिनेत्याचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मुळचे भोपाळचे रहिवासी अरुण वर्मा पीपल्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. गुरुवारी सकाळी त्याने अखेरचा श्वास घेतला.
अरुण वर्मा यांच्या निधनाची माहिती कवी उदय दहिया यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यांनी लिहिले- 'मला अत्यंत दुःखाने कळवावे लागते की, माझे मित्र अभिनेते अरुण वर्मा यांचे आज सकाळी भोपाळ येथे निधन झाले. देव त्याला आपल्या चरणी स्थान देवो. ओम शांती शांती शांती...'
अरुण वर्माने सलमान खानच्या 'किक' या चित्रपटात काम केले होते. अरुण वर्मा यांना रंगभूमीची खूप आवड होती, ते त्यातील बारकावे जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध नाट्य कलाकार बाव कारंथ यांच्याकडे गेले. ते त्यांचे शिष्य होते.
अभिनयाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर अरुण वर्मा मुंबईत आले. त्यानंतर तो सनी देओलसोबत डकैत या चित्रपटात पहिल्यांदा दिसला होता. जावेद अख्तर यांनी अरुण वर्मा यांना ही ऑफर दिली.
त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. अरुण वर्माने नायक, प्रेम गंथ, मुझे शादी करोगी, हिरोपंती, खलनायक यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केले. जवळपास 80 चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.
अभिनेत्याच्या निधनानंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. त्याचबरोबर अभिनेत्याच्या कुटुंबीयांना हिंमत दाखवण्याचे आवाहनही केले जात आहे.