जेनेलियासाठी 'पती हा परमेश्वर', मग रितेशला कोणत्या गोष्टीची अडचण?

अभिनेता  रितेश देशखमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख हे क्युट कपल कायम सोशल मीडियावर चर्चेत असतं. 

Updated: Sep 17, 2021, 11:01 AM IST
जेनेलियासाठी 'पती हा परमेश्वर', मग रितेशला कोणत्या गोष्टीची अडचण?

मुंबई : अभिनेता  रितेश देशखमुख आणि पत्नी जेनेलिया देशमुख हे क्युट कपल कायम सोशल मीडियावर चर्चेत असतं. शिवाय रितेश आणि जेनेलिया कायम त्यांच्या चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. शिवाय सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील तुफान  व्हायरल होत असतात. आता देखील त्यांचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये जेनेलियाच्या मते पती हा परमेश्वर असतो, पण रितेशला एक गोष्ट मात्र खटकत आहे. व्हिडिओमध्ये दोघांची केमिस्ट्री फार सुंदर दिसत आहे. 

रितेशने नुकताचं एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये रितेश म्हणतो, 'माझी पत्नी मला परमेश्वर समजते... ' यावर जेनेलिया म्हणते, 'हो खरंच...' त्यानंतर रितेश म्हणतो, 'ती असं दाखवते मी आहेच नाही... फक्त काही हवं असेल तर जवळ येते...' सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेश-जेनेलियाचा हा फनी व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना फार आवडला आहे. रितेशच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, तो लवकरचं 'बच्चन पांडे' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एवढंच नाही तर रितेशचे मराठी चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. 'ककुदा' मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.