पाखीकडून सिक्रेट फोटो शेअर, व्हायरल फोटोने एकच खळबळ

अभिनेत्री ऐश्वर्या शर्माचा नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे

Updated: Mar 14, 2022, 07:41 PM IST
पाखीकडून सिक्रेट फोटो शेअर, व्हायरल फोटोने एकच खळबळ title=

मुंबई : 'गुम है किसी के प्यार में' मालिकेतील पाखीचा रोल निभवणारी अभिनेत्री ऐश्वर्या शर्माचा नवीन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने पती नील भट्टसोबचा बेडरुम फोटो शेअर केलाय. या फोटोत दोन्ही स्टार्सना आपण एकमेकांच्या प्रेमात बुडालेलं पाहू शकतो.

बेडरूमधील फोटो समोर
या फोटोत ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट बेडवर पडलेले दिसत आहेत. दोघं एकत्र खूप आनंदी दिसत आहेत आणि एकमेकांच्या डोळ्यात मग्न असल्याचं दिसत आहेत.

जबरदस्त बॉन्डिंग 
या फोटोमध्ये या दोन स्टार्सची बॉन्डिंग जबरदस्त दिसत आहे. फोटोमध्ये ऐश्वर्याने डेनिम जीन्ससोबत रेड कलरचा टॉप घातला आहे. तर दुसरीकडे, नीलने डेनिम जीन्ससोबत पांढरा फुल स्लीव्ह टी-शर्ट घातला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्नाला तीन महिने पूर्ण 
नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले आहेत. बेडरूममधील हा रोमँटिक फोटो शेअर करत ऐश्वर्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की,  3 महिने झाले त्याच्या मिठीत झोपून पण त्याचं घोरणं मला झोपू देत नाही...