Gigi Hadid च्या आईचा झेन मलिकवर मारहाणीचा आरोप

प्रसिद्ध सुपरमॉडेल गिगी हदीद आणि गायक झेन मलिक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 

Updated: Nov 1, 2021, 04:30 PM IST
Gigi Hadid च्या आईचा झेन मलिकवर मारहाणीचा आरोप title=

मुंबई : प्रसिद्ध सुपरमॉडेल गिगी हदीद आणि गायक झेन मलिक यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या बातमीने त्यांचे चाहते खुपच दु:खी झाले. हॉलिवूडची ही सुंदर जोडी दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. हदीदच्या कौटुंबिक मित्राने सांगितले की, दोघे एकत्र राहत नाहीत पण दोघेही चांगले पालक बनून मुलीची काळजी घेतील.

 गिगी हदीदची आई योलांडा हदीदला तिची मुलीसाठी आणि नातवंड यांची विशेष काळजी आहे. गिगीचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी लोकांनी या जोडीला थोडी प्रायव्हसी देण्याचे आवाहन केले.

योलांडा हदीद यांचे गंभीर आरोप

गेल्या काही दिवसांपासून ही जोडी चर्चेत आहे. जेव्हा गिगीच्या आईने झेनवर गंभीर आरोप केले, की जैनने गिगीच्या अनुपस्थितीत त्यांची मारहाण केली.अहवालानुसार, योलांडा हदीदने जेन विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्याचे तिचे मन बनवले आहे. झेनच्या बाजूने सर्व आरोप खोटे असल्याचे सांगण्यात आले आहे.