अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लुक, PHOTO आले समोर

Giorgia Andriani : जॉर्जिया एंड्रियानीने मलायका अरोरालाही टाकलं मागे, बोल्ड लुकची एकच चर्चा

Updated: Nov 24, 2022, 10:19 PM IST
अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लुक, PHOTO आले समोर  title=

Giorgia Andriani :  बॉलिवूड अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अरबाज खान (Arbaaz Khan) याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) हिची बॉलिवूडमध्ये (Bollywood) नेहमीच चर्चा असते. जॉर्जियाच्या नवनवीन फोटोशूटवरून ही चर्चा रंगत असते. त्यात आता ती सोशल मीडियावर देखील फोटो शेअर करत असेत. अशाच एका तिच्या फोटोची चर्चा रंगली आहे. हा तिचा फोटो चाहत्यांना खुप आवडला आहे.  

हे ही वाचा : Richa Chadha च्‍या गलवान ट्विटवर अक्षय कुमार भडकला, म्हणाला...

जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. त्यात आता तिने नवीन फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा आहे.  

फोटोत काय?

या फोटोंमध्ये जॉर्जिया अँड्रियानी (Giorgia Andriani) कॅमेऱ्यासमोर तिचा किलर लूक दाखवत आहे. जॉर्जिया एंड्रियानी सोफ्यावर पडली आहे आणि कॅमेरासमोर तिच्या किलर लुक देत आहे. एका फोटोत ती एकटी दिसत होती, तर दुसऱ्या चित्रात तिचा पाळीव कुत्रा अभिनेत्रीच्या पायावर बसलेला दिसत आहे.

लुकची एकच चर्चा 

या फोटोंमध्ये जॉर्जिया अँड्रियानीने (Giorgia Andriani) डीपनेक टॉप घातला आहे. आणि त्यासोबत शॉर्ट्स घातल्या आहेत. हा डीप नेक ड्रेस परिधान करून जॉर्जिया तिच्या डीप नेक ब्रा फ्लॉंट करताना दिसली आहे. तिचा हा लुक चाहत्यांना खुप आवडला आहे.  

दरम्यान जॉर्जिया एंड्रियानी (Giorgia Andriani) एक इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे, जी बॉलीवूडमध्ये करिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. जॉर्जिया सध्या अरबाज खानला (Arbaaz Khan) डेट करत आहे. अभिनेत्री कधीकधी सुट्टीच्या दिवशी अरबाजसोबत पार्टी करताना दिसते. जॉर्जिया आणि अरबाज यांच्या वयाचे अंतर मोठे असले तरी. पण दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग नेहमीच दिसून आली आहे. तसेच ती नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते.