Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का?

Celeb Childhood Photo : या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे. 

Updated: Feb 4, 2023, 01:33 PM IST
Guess Who : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखलंत का? title=

Urmila Matondkar Birthday : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्रीला (Bollywood Actress) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्रीचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेत्री ओळखायची आहे. 

फोटोत काय? 

फोटोत तुम्ही पाहू शकता काही बडे स्टार्स आहेत, तर काही बाल कलाकार आहे. यामध्ये एक मुलगी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री (Bollywood Actress)आहे. ही अभिनेत्री तिच्या काळातील सर्व मोठ्या स्टार्सची नायिका राहिली आहे. या मुलीने लहानपणी नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. ही मुलगी मासूम चित्रपटात बड्या स्टार्ससोबत दिसली होती. या चित्रपटातील या मुलीचा गोंडसपणा आणि अभिनय लोकांना आवडला होता. नंतर ही मुलगी मोठी झाली आणि अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली होती.

जर तुम्ही अजुनही या अभिनेत्रीला (Bollywood Actress) ओळखले नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की,  एकेकाळी बॉलिवूडची टॉप अभिनेत्री असलेल्या उर्मिला मातोंडकरचा (Urmila Matondkar) हा बालपणीचा फोटो आहे. तिने केवळ हिंदी चित्रपटातच नाही तर मल्याळम, मराठी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले. उर्मिलाने 'मासूम', 'नरसिंहा', 'रंगीला', 'भारतीय', 'जुदाई', 'सत्या', 'खूबसूरत', 'जंगल', 'प्यार तुने क्या किया', 'भूत', 'पिंजरा', ती 'एक हसीना थी', 'कर्ज', 'दीवाना', 'जनम समझा करो', 'मनी मनी', 'बडे घर की बेटी', 'द्रोही' यांसारख्या मोठ्या हिट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.  

उर्मिलाने (Urmila Matondkar) पहिला चित्रपट श्याम बेनेगल दिग्दर्शित 'कलयुग' हा केला होता.  या चित्रपटात उर्मिला (Urmila Matondkar) 'परीक्षित'च्या भूमिकेत होती. हा चित्रपट हिट ठरला होता. 1983 मध्ये उर्मिला 'मासूम'मध्ये दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक 'शेखर कपूर' होते. यात उर्मिला पिंकीच्या भूमिकेत होती. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, जुगल हंसराज मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपटही हिट ठरला होता.

दरम्यान सध्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) बॉलिवूडपासून दुरच आहे. मात्र तिने राजकारणात प्रवेश केला आहे. कॉग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर तिने दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत तिला अपयश आले आहे. यानंतर पक्षांतर्गत गटबाजीमुळे कॉग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या ती शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करत आहे.