'या' नव्या नियमांसह चित्रपटगृह पुन्हा सुरु

जवळपास सात महिन्यांपासून कुलूपबंद असणारी चित्रपटगृह 

Updated: Oct 15, 2020, 07:49 AM IST
'या' नव्या नियमांसह चित्रपटगृह पुन्हा सुरु
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अनलॉक 5.0 च्या घोषणेनंतर देशात अनेक सेवा- सुविधा पुन्हा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं. त्यातच आता आणखी एक भर पडली आहे. coronavirus कोरोना व्हायरसच्या संकटाची पार्श्वभूमी पाहता जवळपास सात महिन्यांपासून कुलूपबंद असणारी चित्रपटगृह आता पुन्हा एकदा सुरु होत आहेत. महाराष्ट्राच मात्र ही बंदी कायम असणार आहे. 

केंद्राकडून अनल़़ॉकच्या या टप्प्यात चित्रपटगृह खुली करण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ज्यांचं सक्तीनं पालन करणं अपेक्षित आहे. शिवाय नवे चित्रपट दाखवण्यात येणार की, दरम्यानच्या काळातील चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जाणार याबाबतचा निर्णय मात्र प्रतिक्षेत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला चित्रपटगृहांमध्ये काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेले चित्रपटही दाखवण्यात येणार आहेत. 

चित्रपटगृह पुन्हा सुरु करण्याचा निर्णय देत केंद्रानं दिलेले काही नियम- 

- चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु करण्यात येणार आहेत. 
- चित्रपटगृहांमध्ये एक आसन सोडूनच पुढच्या आसनावर बसण्याची व्यवस्था केलेली असवी. 
- चित्रपटगृहात मास्कचा वापर सक्तीचा असेल. 
- चित्रपट पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकानं सोबत सॅनिटायझर बाळगणं आणि त्याचा वापर करणं गरजेचं आणि अपेक्षित असेल. 

 

सध्याच्या काळात कोणचाही नवा चित्रपट प्रदर्शित केला जाणार नसल्याची बाब समोर येत आहे. परिणामी लॉकडाऊनच्या आधीच्या काळात प्रदर्शित झालेले चित्रपट येथं पुन्हा प्रदर्शित केले जाऊ शकतात असं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे कोरोनाच्या संकटादरम्यान गेल्या बऱ्याच महिन्यांपासून चित्रपटगृह बंद ठेवण्यात आले होते. पण, आता मात्र या व्यवसायाचा आणि त्याच्याशी संबंधीत व्यवसायांवर उदरनिर्वाह करणाऱ्यांना आणि अर्थातच कलाविश्वालाही एक मोठा दिलासा मिळणार हे नक्की.