रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या नव्या वाटचालीला सुरुवात

2021 च्या शेवटी, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा पुष्पा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत खळबळ उडवून दिली. या सिनेमात रश्मिकाने श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारली. जी लोकांना प्रचंड आवडली होती. आता  रश्मिकाच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. जी ऐकून तुम्हालाही खूप आनंद होईल. 

Updated: Aug 14, 2023, 08:12 PM IST
रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; अभिनेत्रीच्या नव्या वाटचालीला सुरुवात title=

मुंबई : अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमीच तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना तिच्या पर्सनल आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घ्यायला देखील फार आवडतं. आता  रश्मिकाच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. जी ऐकून तुम्हालाही खूप आनंद होईल. नुकतीत रश्मिकाने तिच्या सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ज्याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इन्स्टाग्रामवर एर व्हिडीओ रश्मिकाने शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने नव्या वाटचालीला सुरुवात करते असं म्हणताना दिसतेय.

2021 च्या शेवटी, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिकाचा पुष्पा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याने बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत खळबळ उडवून दिली. या सिनेमात रश्मिकाने श्रीवल्ली ही व्यक्तिरेखा साकारली. जी लोकांना प्रचंड आवडली होती. अनेक दिवसांपासून चाहते रश्मिकाच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्याची घोषणा नुकतीच तिने तिच्या सोशल मीडियाव्दारे केली. 

रश्मिका मंदान्नाने नुकतीच सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ती साऊथचा सुपरस्टार धनुषसोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं शीर्षक अद्याप ठरलेले नाही, परंतु सध्या या चित्रपटाचं नाव D51 आहे. शेखर कमुल्ला या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषांमध्ये दिसणार असल्याचं सांगण्यात येत आहे. रश्मिका मंदान्नाने यासंदर्भातील एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

रश्मिका मंदान्नाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की तिच्या चाहत्यांसाठी एक सरप्राईज आहे. याबाबत ती खूप उत्सुकही आहे. व्हिडिओमध्ये पुढे, ती एक फोटो फ्रेम काढते, ज्यामध्ये D51 चे पोस्टर आहे. त्यानंतर या चित्रपटात आपलं स्वागत आहे असं लिहिलं आहे. व्हिडीओ शेअर करत रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं, "नव्या प्रवासाची सुरुवात #D51."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तर अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलंय की,  ही खूप मोठी गुडन्यूज आहे.   खूप खूप अभिनंदन, खूप आनंदी माझं प्रेम तर अजून एकाने लिहीलंय, खूप दिवसांपासून आम्ही तुझ्या सिनेमाची वाट पाहत होतो अतिशय आनंदाची बातमी. अशा अनेक कमेंट चाहते तिच्या या व्हिडीओवर करत आहेत आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.