प्रसिद्ध गोविंदा-निलम यांची जोडी 20 वर्षांनंतर पुन्हा एकत्र झळकणार

इंडस्ट्रीमध्ये जेव्हा  बेस्ट डान्सर अभिनेत्याचा विषय निघतो तेव्हा अभिनेते गोविंदा यांचं नाव अव्वल स्थानी असतं. 

Updated: Jun 1, 2021, 12:28 PM IST
 प्रसिद्ध गोविंदा-निलम  यांची जोडी 20 वर्षांनंतर पुन्हा एकत्र  झळकणार

मुंबई : इंडस्ट्रीमध्ये जेव्हा  बेस्ट डान्सर अभिनेत्याचा विषय निघतो तेव्हा अभिनेते गोविंदा यांचं नाव अव्वल स्थानी असतं. गोविंदा यांच्यामुळे त्या काळात डॉन्सचा एक नवा समोर आला आणि चाहत्यांनी त्या चेहऱ्याला डोक्यावर घेतलं. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आपली नृत्य कला सादर करत चाहत्यांच्या मनात छाप पाडली. आज  गोविंदा रूपेरी पडद्यापासून दूर असले तरी त्यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आज  देखील लग्न किंवा इतर कार्यक्रमांमध्ये गोविंदा यांची गाणी वाजली तर लगेच कार्यक्रमांमध्ये एक आनंदी वातावरण तयार होतं. 

गोविंदा यांच्या डान्सनंतर त्यांची चर्चा असायची ती म्हणजे अभिनेत्री निलम कोठारी यांच्यासोबत चाहत्यांना आवडणारी त्यांची जोडी. एक काळ असा होता जेव्हा गोविंदा आणि निलम यांची जोडी सुपरहीट ठरली होती. आता तब्बल 20 वर्षांनंतर दोघे एकत्र चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.  निलम आणि गोविंदा यांनी नुकताचं 'सुपर डान्सर 4'शोमध्ये दिसणार आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 

यावेळी दोघांनी त्यांचं सुपरहीट 'आप के आ जाने से' या गाण्यावर डान्स केला. निलम आणि गोविंदा शोमध्ये आल्यामुळे शोचे परिक्षक अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अनुराग बासू, गीता कपूर देखील अत्यंत आनंदी होते.  'सुपर डान्सर 4'शोमध्ये अनुभवलेले काही आनंदाचे क्षण निलम यांचे पती अभिनेते समीर सोनी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

सांगायचं झालं तर 80 ते 90 च्या दशकात ही जोडी अत्यंत लोकप्रिय होती. निलम आणि गोविंदा यांनी एकत्र 14 चित्रपटांमध्ये  कान केलं  आहे. ज्यामध्ये 'घराना',  'खुदगर्ज',  'सिंदूर',  'हत्या' , 'लव 86', 'दो कैदी', 'इल्जाम', 'फर्ज की जंग', 'बिल्लू बादशाह', 'ताकतवर', 'घर में राम गली में श्याम', 'दोस्त गरीबों का'  आणि जोरदार चित्रपटांचा समावेश आहे.