close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

VIDEO : वधू रुपातील प्रियांकाला पाहून निक भावूक

जाणून घ्या त्यांच्या प्रेमाचा आतापर्यंतचा प्रवास...   

Updated: Dec 5, 2018, 08:29 AM IST
VIDEO : वधू रुपातील प्रियांकाला पाहून निक भावूक

मुंबई : अनेकदा आपलं आयुष्य अशा वळणावर पोहोचतं जेव्हा आनंद हा अश्रूंच्या वाटचे व्यक्त होतो आणि आपल्या ही गोष्ट लक्षातही येत नाही. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास यांच्या लग्नसोहळ्यात असेच काही भावनिक क्षण पाहायला मिळाले. 

१ डिसेंबर रोजी प्रियांका आणि निक हे दोघंही ख्रिस्त धर्मपद्धतींनुसार विवाहबंधनात अडकले. त्यावेळी दोघंही एखाद्या परिकथेतील पात्रांप्रमाणे दिसत होते. काळ्या आणि पांढऱ्या रंगाची सुरेख सांगड घालत ते 'राल्फ लॉरेन'च्या डिझायनर वेअरमध्ये दिसत होते. 

मुख्य म्हणजे राल्फ लॉरेनकडून याआधी फक्त आणि फक्त तीन वेळाच वेडिंग ड्रेस डिझाईन करण्यात आले होते. जे कुटुंबीयांच्याच लग्नासाठी साकारण्यात आले होते. त्यामुळे प्रियांका आणि निकसाठीचे हे ड्रेसही तितकेच खास ठरले. 'मेट गाला'च्या रेड कार्पेटवरही प्रियांका- निक राल्फ लॉरेनच्या डिझायनर वेअरमध्ये दिसले होते. त्यामुळे या ब्रँडचीही त्यांच्या आयुष्यात एक खास जागा आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

जोधपूरमधील उमेद भवन पॅलेस येथे पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात ज्यावेळी वधूच्या रुपात प्रियांका समोरुन चालत आली, तेव्हा तिच्याकडे पाहून, निकच्या डोळ्यातून नकलत आसवं घरंगळली. त्याचा आनंद अश्रूंवाटे व्यक्त होत होता. सोशल मीडियावर 'पीपल' तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये हा खास क्षण पाहता येत आहे.

 
 
 
 

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

आईचा हात घट्ट पकडून प्रियांकाही या क्षणी जितकी आनंदात दिसली, तितकीच ती भावूकही होती. तिलाही आपल्या अश्रूंना आवर घालणं अशक्य झालं. अतिशय सुरेख असे ते क्षण निक- प्रियांकासाठी अनेक आठवणी देऊन गेले, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.