Guess Who: करिश्मा कपूरसोबत फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का?

फोटोतला चिमुकला आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, अभिनेत्याची बायको देखील प्रसिद्ध अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का या स्टारला? 

Updated: Oct 3, 2022, 06:24 PM IST
 Guess Who: करिश्मा कपूरसोबत फोटोत दिसणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? title=

मुंबई : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे लहाणपणीचे आणि प्रौढ अवस्थेतले फोटो समोर येत असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. हा फोटो पाहून तुम्हाला अभिनेत्याला ओळखायचं आहे. तुम्हाला हा अभिनेता (Actor) ओळखता येतोय का पाहा? 

फोटोत काय? 
फोटोमध्ये करिश्मा कपूरसोबत (Karishma kapoor)  दिसणारा हा मुलगा आता मोठा झाला असून बॉलिवूडचा सुपरस्टार (Bollywood Superstar) बनला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडेच त्याचा एक सुपरहिट चित्रपट देखील रिलीज झाला होता.या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box office) प्रचंड कमाई केली होती. त्याची पत्नी देखील बॉलीवूडची सुपरस्टार आहे. त्याचबरोबर हे स्टार कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत.

'हा' आहे अभिनेता
कदाचित तुम्ही आत्तापर्यंत या मुलाला ओळखले असेल अशी आम्ही अपेक्षा करतो. मात्र जर तुम्ही ओळखले नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, फोटोत दिसणारे लहान मुलं हे दुसरे तिसरे कोणी नसून रणबीर कपूर (ranbir kapoor) आहे. 

रणबीरने (ranbir kapoor) याच वर्षी अभिनेत्री आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) लग्न केले. नुकताच दोघांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले. रणबीर आणि आलिया लवकरच आई-वडील होणार आहेत.दरम्यान रणबीर कपूरचे आई-वडील लोकप्रिय चित्रपट कलाकार ऋषी कपूर आणि नीतू सिंग आहेत. तो राज कपूरचा नातू आहे. त्याने चित्रपटसृष्टीत आपल्या कपूर कुटुंबाचे नाव रोशन केले आहे.