दिल्लीवालोसे डर लगता है... गुलजारांचा मोदी सरकारला टोला

गुलजार प्रत्येक विषयावर आपलं मत मांडत असतात.

Updated: Dec 29, 2019, 06:41 PM IST
दिल्लीवालोसे डर लगता है... गुलजारांचा मोदी सरकारला टोला

मुंबई : 'तुझसे नाराज नही जिंदगी', 'आनेवाला पल जानेवाला हैं','दो दिलाने से शहर मैं' अशा अनेक गाण्यांच्या माध्यमातून  प्रसिद्ध गीतकार गुलजार रसिकांच्या भेटीस आले. तर गुलजार प्रत्येक विषयावर आपलं मत मांडत असतात. नुकताच एका वृत्तसंस्थेने एक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी आपलं मत मांडलं.

त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात 'मित्रों' म्हणत सुरूवात केल्यानंतर एकच हशा पिकला. त्याचबरोबर उपस्थितांनी टाळ्याही वाजवल्या. यावेळी गुलजार यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला

ते म्हणाले की 'दिल्लीवालोसे डर लगता है, न जाने कब नया कानून लेकर चले आते हैं.' सध्या देशात CAA, NCR,आणि NPR कायद्यामुळे देशात आंदोलनं होत आहे. या आंदोलनामुळे सार्वजनिक मालमत्तेचं प्रचंड नुकसान झाले आहे.

सात ते आठ राज्यांनी हा कायदा लागू करणार नाही असंही म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनीही पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू करण्याला विरोध दर्शवला आहे. काँग्रेस तर या कायद्याला विरोध दर्शवतेच आहेत.