'छपाक' अयशस्वी ठरल्यामुळे गुलझार नाराज

त्यांनी अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली.   

Updated: Jan 21, 2020, 08:52 PM IST
'छपाक' अयशस्वी ठरल्यामुळे गुलझार नाराज

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर 'छपाक' चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक मेघना गुलजार यांना मोठा धक्का बसला आहे. तर चित्रपटाचं नाव सुचवणारे प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. आज झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी मुंबईत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुलझार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. गझल आणि शास्त्रीय गायक रूप कुमार राठोड आणि सोनाली राठोड यांची मुलगी रीवा राठोडचं एक अल्बम या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात येणार होतं.

या कार्यक्रमात मीडिया देखील उपस्थित होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी गुलजार देखील वेळेत पोहोचले पण मीडियाला पाहिल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला. अखेर गुलझार कोणत्याही प्रकारची मुलाखत देणार नाहीत अशा सुचना देखील राठोड कुटुंबकडून देण्यात आल्या होत्या. 

पण, त्यानंतर ही ते कार्यक्रमाकडे फिरकले नाही. अखेर रीवा राठोडच्या एल्बमचं प्रदर्शन गुलझार यांच्या अनुपस्थित पार पडलं. 'छपाक' चित्रपट १० जानेवारी रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झाला होता. पण हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा पसंतीस पडला नाही. 

अभिनेता अजय देवगन स्टारर 'तान्हाजी' आणि 'छपाक' एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर धडकले. तर या दोन चित्रपटांच्या 'कांटे की टक्कर' मध्ये 'तान्हाजी' चित्रपटाने बाजी मारली आहे.