सुशांत सिंगच्या आयुष्यात नव्या तरूणीची एन्ट्री?

नव्या गर्लफ्रेंडमुळे सुशांत चर्चेत.  

Updated: Jan 21, 2020, 05:37 PM IST
सुशांत सिंगच्या आयुष्यात नव्या तरूणीची एन्ट्री? title=

मुंबई : 'पवित्र रिश्ता' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरात पोहोचलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूतने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या मालिकेनंतर त्याने थेट मोठ्या पडद्यावर उडी मारली. त्याने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपटं दिली आहेत. नेहमी मोठा पडदा गाजवणार हा अभिनेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असतो.

परंतु यावेळी सुशांत त्याच्या कुठल्याही पोस्टमुळे नव्हे तर त्याच्या नव्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आहे. होय हे खरं आहे, सुशांतच्या आयुष्यात एका नव्या तरूणीचं आगमन झाले आहे. सुशांतच्या आयुष्यात खास स्थान मिळवणारी तरूणी अभिनेत्री रेखा चक्रवर्ती आहे. 

सुशांतच्या वाढदिवसाचे औचित्य साधत काही फोटो तिने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून शेअर केले आहेत. त्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे.  या फोटोवरुनच दोघांच्या रिलेशलनशिपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

परंतु या दोघांकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण त्यांनी ज्या प्रकारे हे फोटोशूट केले आहे, त्यावरुन दोघे एकमेकांना नक्कीच डेट करत असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

आता दोघांच्या नात्याच्या चर्चा जोरदार रंगल्या आहेत. यापूर्वी 'पवित्र रिश्ता' मालिकेच्या सेटवर अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि त्याचं सुत जुळून आलं होतं, तर हे दोघे लग्न दोखील करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

त्यानंतर सुशांतच्या आयुष्यात अभिनेत्री क्रिती सॅनॉन आल्यामुळे त्यांचे ब्रेकअप झाले. पुढे त्याचे क्रिती बरोबरही ब्रेकअप झाले. आता त्याच्या आयुष्यात रेखा चक्रवर्तीची एन्ट्री झाल्याचं समोर येत आहे.