वयाच्या 54 व्या वर्षी बॉलिवूड सेलिब्रिटीने बांधली लग्नगाठ; दोन मुलींच्या जन्मानंतर निर्णय

बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सफिना हुसैनसोबत (safeena Husain) लगीनगाठ बांधलीय. 

Updated: May 25, 2022, 01:29 PM IST
वयाच्या 54 व्या वर्षी बॉलिवूड सेलिब्रिटीने बांधली लग्नगाठ; दोन मुलींच्या जन्मानंतर निर्णय  title=

मुंबई : बॉलिवूडचे लोकप्रिय चित्रपट निर्माता-दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी सफिना हुसैनसोबत (safeena Husain) लगीनगाठ बांधलीय. आज सकाळी त्यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली. हंसल मेहतांच्या या पोस्टवर बॉलिवूड विश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

हंसल मेहता आणि सफिना हे दोघेही 17 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होते, परंतु या नात्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले नव्हते. आज दोघेही  अधिकृतपणे एकमेकांचे बनले आहेत. दोघांनीही आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला आहे. 25 मे 2022 ही हंसल मेहता आणि सफीना यांच्या आयुष्यातील एक संस्मरणीय तारीख ठरली आहे. हा तो खास दिवस आहे जेव्हा जोडप्याने एकमेकांना सदैव साथ देण्याचे वचन दिले होते. 

हंसल मेहता यांची पोस्ट
लक्ष्य आणि हायवे सारख्या सर्वोत्कृष्ट सिनेमांसाठी ओळखले जाणारे हंसल मेहता यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे जी सध्या खूप चर्चेत आहे. फोटोंमध्ये हंसल (Hansal Mehta) आणि सफीना कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना दिसत आहेत.

पोस्ट शेअर करताना हंसल मेहता यांनी लिहिले की, 'म्हणून १७ वर्षांनंतर दोन लोकांनी त्यांच्या मुलांना मोठे होताना पाहिले आणि स्वप्नांचा पाठलाग करताना आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. जीवनात नेहमीप्रमाणे, हे देखील अचानक आणि अनियोजित होते. शेवटी प्रेम इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठं असतं.मेहता यांच्या या पोस्टला खूप पसंत दिली जात आहे.

'या' सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा 

हंसल यांनी तपकिरी रंगाचा ब्लेझर आणि पांढरा टी-शर्ट घातलेला दिसतो, तर सफिना (safeena Husain) गुलाबी सलवार सूट परीधान केलाय. कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर दोघे कुटुंबियांसोबत पोज देताना दिसत आहेत. सिनेनिर्माते विशाल भारद्वाज, अनुभव सिन्हा, अभिनेते राजकुमार राव, मनोज बाजपेयी यांनी त्यांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हंसल मेहताच्या 'मॉडर्न लव्ह मुंबई' या वेब सीरिजचा अभिनेता प्रतीक गांधी याने लिहिले की, 'ये प्यार है..' यावर त्याने हार्ट इमोजीही शेअर केले.

कोण आहेत सफिना?

सफिनापासून हंसल यांना दोन मुली आहेत.  तर पहिली बायको सुनिता मेहतापासून त्यांना दोन मुलंही आहेत. यापूर्वी त्यांनी सफिनाची ओळख पत्नी म्हणून करून दिली होती. सफिना एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि एज्युकेट गर्ल्स नावाच्या ना-नफा संस्थेच्या संस्थापक आहे. दिवंगत अभिनेते युसूफ हुसैन यांची ती मुलगी आहे.