'हनुमान'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार क्रेझ! रिलीजच्या तिसऱ्याच दिवशीच निर्मात्यांचा पैसा वसूल; एकूण कमाई...

Hanu Man Box Office Collection Day 3 : थिएटर्स मिळत नसतानाही 'हनुमान' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई...

दिक्षा पाटील | Updated: Jan 14, 2024, 02:50 PM IST
'हनुमान'ची बॉक्स ऑफिसवर जोरदार क्रेझ! रिलीजच्या तिसऱ्याच दिवशीच निर्मात्यांचा पैसा वसूल; एकूण कमाई... title=
(Photo Credit : Social Media)

Hanu Man Box Office Collection Day 3 : 'हनुमान' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 12 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथे बॉक्स ऑफिसवर इतके चित्रपट प्रदर्शित झाले तिथे या चित्रपटानं एन्ट्री करत काही ठरावीक थिएटर्स मिळाले. तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगली कमाई केली. त्यासोबत सगळ्यांचं लक्ष देखील वेधलं आहे. कारण दिवसेंदिवस या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. 

या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 8.05 कोटींची कमाई केली आहे. तर शुक्रवारी हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची आणखी गर्दी वाढली. वर्ल्डवाईड हा आकडा 20 कोटी झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटानं दुसऱ्या दिवशी वर्ल्ड वाईड जवळपास 14 कोटींची कमाई केली आहे. तर भारतात दुसऱ्या दिवशी जवळपास 12.50 कोटींची कमावले. Sacnilk नं दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, 'हनुमान' या चित्रपटानं तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला म्हणजेच आतापर्यंत 4.34 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर अशात चित्रपटानं आतापर्यंत एकूण 28.99 कोटींची कमाई केली. मात्र, शेवटचे आकडे अजून काही समोर आलेले नाही. त्यामुळे आता नक्कीच चित्रपटानं चांगली कमाई केली असेल अशी आशा आहे. तर या चित्रपटाचं बजेट हे 25 कोटी होतं. 

'हनुमान' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत वर्मा यांनी केले आहे. तर हा चित्रपट आरकेडी स्टूडियोच्या बॅनरखाली बनवण्यात येणार आहे. तर या चित्रपटाची निर्मिती ही कुमार जेट्टी यांनी केले आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टविषयी बोलायचे झाले तर तेजा सज्जा महत्त्वाच्या भूमिकेत आहे. त्याशिवाय चित्रपटात अमृता अय्यर, वरलक्ष्मी सरथकुमार, विनय राय आणि राज दीपक शेट्टी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहे. कुशल रेड्डी चित्रपट एसोसिएट प्रोड्युसर आहेत. 

हेही वाचा : 'आजोबा काही सुपरस्टार नाहीत'; अगस्त्य नंदाचं अमिताभ यांच्याबद्दल जगावेगळं मत, कारण...

चित्रपटाला मिळाले कमी थिएटर्स

दुसरीकडे चित्रपटाच्या टीमनं तेलंगनाच्या काही थिएटर्ससोबत कॉन्ट्रॅक्ट केला होता. पण त्यातील काही थिएटर्स मालकांनी त्याकडे दुर्लक्ष करत चित्रपट प्रदर्शित केला नाही. यावरून नाराज असलेले डिस्ट्रिब्युचर्स आणि निर्माते निरंजन रेड्डीयांनी टीएफपीसीमध्ये तक्रार दाखल केली आहे.