Viral Video: लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. वॉशिंग्टनच्या गोन्झागा विद्यापीठाच्या पुरुष बास्केटबॉल संघाला घेऊन जाणारं खासगी विमान एका प्रवासी विमानाला धडक देतं का काय अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र हवाई वाहतूक नियंत्रकाने त्वरीत हस्तक्षेप केल्याने ही दुर्घटना टळली. बास्केटबॉल संघाला घेऊन जाणारं विमान धोकादायकपणे उड्डाण करत असलेल्या दुसऱ्या विमानाच्या धावपट्टीच्या अगदी जवळ आल्यानंतर अधिकारी "थांबा, थांबा, थांबा" असा आदेश देताना ऐकू येत आहे.
शुक्रवारी घडलेल्या या घटनेची फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (एफएए) चौकशी सुरू केली आहे. "एअर ट्रॅफिक कंट्रोलर्सनी की लाइम एअर फ्लाइट 563 ला (Key Lime Air Flight 563) लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टी ओलांडताना कमी अंतर ठेवण्याचे निर्देश दिले होते. कारण त्यावेळी दुसरे विमान धावपट्टीवरून उड्डाण करत होते. जेव्हा Embraer E135 विमान होल्ड बार ओलांडण्यासाठी पुढे गेले तेव्हा हवाई वाहतूक नियंत्रकांनी वैमानिकांना थांबण्यास सांगितलं. जेटने रनवे ओलांडला नाही," असं एफएएने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.
ही संपूर्ण घटना विमान-स्पॉटिंग लाइव्हस्ट्रीमवर कैद झाली आहे. ज्यामध्ये एअर ट्रॅफिक कंट्रोलर आपल्या चीमला विमानावा “थांबा, थांबा, थांबा” असं सांगत असल्याचा ऑडिओ कैद झाला आहे.
“STOP STOP STOP!” LAX ATC urgently called out to a Key Lime Air jet as a Delta jet took off from runway 24L. Was this a runway incursion? All of it captured live during Friday’s Airline Videos Live broadcast. pic.twitter.com/5vwQfVzggQ
— AIRLINE VIDEOS (@airlinevideos) December 28, 2024
यानंतर उड्डाण ताबडतोब थांबलं, आणि नंतर काही क्षणांनी पुढे गेलं. ते वॉशिंग्टनमधील स्पोकेन येथून लॉस एंजेलिसला येत होते. विद्यापीठाने या घटनेची दखल घेत सांगितलं आहे की, "विमानात बसलेल्या आमच्या टीमच्या सदस्यांना असं काही घडल्याची कल्पा नव्हती. आम्हा सर्वांसाठी ही घटना सुरक्षितपणे संपली याबद्दल आम्ही आभारी आहोत".
डेल्टाच्या प्रवक्त्याने सांगितले की त्यांच्या विमानांना कोणतीही समस्या नाही. “डेल्टा फ्लाइट 471 ने नेहमीप्रमाणे उड्डाण केलं आणि आम्हाला या फ्लाइटबाबत FAA कडून काहीही सांगण्यात आलेलं नाही. आम्ही विमान वाहतूक अधिकाऱ्यांना त्यांच्या तपासात सहकार्य करत आहोत," असं एअरलाइनने ईमेलमध्ये म्हटले आहे. लाइम एअरने ही घटना कशी घडली यावर भाष्य केलेलं नाही.