Happy Bday Akash : 'सैराट'मधील परश्याचा मेकओव्हर

'लस्ट स्टोरी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री 

Updated: Feb 24, 2020, 11:41 AM IST
Happy Bday Akash : 'सैराट'मधील परश्याचा मेकओव्हर

मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' सिनेमातून अभिनेता आकाश ठोसर रातोरात स्टार झाला. 'सैराट', 'एफयू' आणि 'लस्ट स्टोरी'नंतर आकाश सध्या कोणत्याच चित्रपटात काम करत नाही. पण तरी देखील तो चर्चेत आहे. याला कारण म्हणजे त्याचे 'सिक्स पॅक'. सध्या त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

आकाशानं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या सिक्स पॅकचा फोटो शेअर केला आहे. यामुळे पुन्हा एकदा त्याची चर्चा रंगली आहे. 

आकाशने या आधी देखील आपल्या वर्कआऊटचे फोटो शेअर केले आहेत. वर्क आऊट फ्रिक असलेल्या आकाशने आतापर्यंत आपल्या लूकवर प्रचंड मेहनत घेतली आहे. 'लस्ट स्टोरी'मध्ये त्याने आपल्या लूकवर प्रचंड मेहनत केल्याचं दिसून येतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

When You Feel like Quitting, Remember Why You Started!#motivation

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

आकाश ठोसरचा आज बर्थ डे आहे. 24 फेब्रुवारी 1993 साली जन्मलेला आकाश कुस्तीपट्टू आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे आकाशचा जन्मस्थळ. आकाश पुण्यातील सावित्रीबाई महाविद्यालयातून पदवीधर झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Stay Focused On Your Mission  #fitnessfreak #fitness

A post shared by Akash Thosar (@akashthosar) on

आकाश नागराज मंजुळेचा आगामी सिनेमा 'झुंड' मध्ये दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. या सिनेमाचा टीझर लाँच झाला. मात्र अद्याप सिनेमातील कलाकारांची झलक यामध्ये दाखवण्यात आली नाही. अमिताभ बच्चन या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.