मुंबई : एका चित्रपटासाठी दोन ऑस्कर मिळवलेला आणि सतत जीवन प्रवास संपण्याच्या विचारत असणारा सुप्रसिद्ध संगीतकार एआर रेहमानचा आज वाढदिवस. ६ जानेवारी १९६६ साली तामिळनाडू मधील एका संगीतिय कुटुंबात त्याचा जन्म झाला. संगीत क्षेत्रात त्याने भारतीय चित्रपट सृष्टीला वरच्या स्थरावर नेलं आहे. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्याने संगीत दिलेले काही उल्लेखनीय चित्रपट आहेत.
एआर रेहमानच्या आयुष्यात एक असा काळ होता जेव्हा तो सतत त्याचं जीवन प्रवास संपवण्याचा विचार करत होता. एका मुलाखती दरम्यान त्याने त्याच्या जीवनातील खडतर प्रवासाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अवघ्या वयाच्या ९व्या वर्षी वडिलांचे छत्र गमावल्याने त्याला मोठा धक्का बसला होता.
वडिल गेल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी रेहमानच्या खांद्यावर आली. त्यामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. संगीतिय घरात जन्म झाल्यामुळे घरात कायम संगीताचे वातावरण आणि अनेक प्रकारचे वाद्य होती. पण आर्थिक परिस्थितीमुळे वाद्य विकण्याची वेळ त्याच्यावर आली.
त्यानंतर वयाच्या ११व्या वर्षी त्याने मित्र शिवमणीसोबत रेहमानने बॅन्ड रूट्ससाठी कि-बोर्ड वाजवण्यास सुरूवात केली आणि त्याच्या संगीतमय प्रवासाला सुरूवात झाली. काहीदिवसांनंतर त्याला लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिककडून शिष्यवृत्ती देखील मिळाली. त्यानंतर त्याने पाश्चात्य शास्त्रीय संगीतात पदवी देखील प्राप्त केली.
रेहमान विषयी महत्त्वाचं सांगायचं झालं तर त्याला एकाच चित्रपटासाठी दोन ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्या चित्रपटाचं नाव होतं 'स्लमडॉग मिलेनियर'. २००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलेनियर या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमानाला ऑस्कर, गोल्डन ग्लोब व बाफ्टा पुरस्कार मिळाले आहेत. अशा या गुणी संगीतकाराला मानाचा मुजरा.