close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मी हस्तमैथुन करतो हे वडिलांना कळालेलं; अभिनेत्याचा खुलासा

वडिलांना कळालेलं की मी.... 

Updated: Sep 14, 2019, 09:57 AM IST
मी हस्तमैथुन करतो हे वडिलांना कळालेलं; अभिनेत्याचा खुलासा
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : एका रिऍलिटी शोपासून सुरु झालेल्या प्रवासाला यशशिखरावर पोहोचवणाऱ्या एका अभिनेत्याने प्रेक्षकांच्या मनाचा चांगलाच ठाव घेतला आहे. सूत्रसंचालक, एका कार्यक्रमातील स्पर्धक, लेखक, गायक अशा विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय असणारा आणि कायमच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना न्याय देणारा हा चेहरा म्हणजे अभिनेता आयुषमान खुराना याचा. वयाच्या ३५ व्या वर्षी आयुषमानने बरंच यश संपादन केलं आहे. 

राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंतही त्याने मजल मारली आहे. अशा या अभिनेत्याचा कायमच सर्वांना हेवा वाटला आहे. फक्त चित्रपटांच्या माध्यमातून नव्हे, तर आयुषमानने कायमच काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्याचं ठाम मत सर्वांसमक्ष ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये लैंगिक शिक्षणाचा मुद्दाही प्रकर्षाने समोर आला आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून ते थेट लैंगिक शिक्षणाविषयी पालकांशी झालेल्या संवादापर्यंत चर्चा केली. 

चित्रपटांच्या माध्यमातून, तू कायम लैंगिक शिक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलंस. पण, केव्हा पालकांशी कधी अशा मुद्द्यावर तुझं बोलणं झालं आहे का?, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावेळी वडिलांशी एकदा या विषयावर आपला संवाद झाल्याचं त्याने स्पष्ट केलं. 'मी हस्तमैथुन करत असल्याचं वडिलांना कळालं होतं. तेव्हा हे सारंकाही सामान्य असल्याचं ते म्हणाले होते. या वयात असं होतं', असं वडिलांनी म्हटल्याचा खुलासा त्याने केला. 

 
 
 
 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

आपला अनुभव सांगणाऱ्या आयुषमानने यावेळी एका महत्त्वाच्या मुद्द्य़ावरही प्रकाशझोत टाकला. चित्रपटांच्या माध्यमातून आपण कितीही म्हटलं की लैंगिक शिक्षण मिळणं गरजेचं आहे, पण ही बाबही तितकीच खरी आहे, की आई- वडिलांशी या मुद्द्य़ावर भाष्य करणं काहीसं संकोचपूर्ण असतं. आपल्या देशात तरी निदान अशीच परिस्थिती आहे, असं तो या मुलाखतीत म्हणाला होता. आयुषमानच्या एकंदर कारकिर्दीचा आलेख पाहता, आपल्या प्रत्येक वक्तव्याला ठामपणे सर्वांसमोर ठेवणारा हा अभिनेता चाहत्यांच्या गळ्यातील ताईत का आहे, हेच स्पष्ट होतं.