कंगनाचं पाली हिल येथील भव्य ऑफिस पाहिलात का...

तब्बल इतक्या कोटींचा आहे कंगनाचा आलिशान ऑफिस.

Updated: May 26, 2020, 09:42 AM IST
कंगनाचं पाली हिल येथील भव्य ऑफिस पाहिलात का... title=

मुंबई : नेहमी वादग्रस्त विधानांमुळे ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतचा प्रवास अनेक नवीन कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. 'फॅशन', 'पंगा', 'तनू वेड्स मनू', ‘मणिकर्णिका' अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून तिने चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शन, लेखन क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत तिने गेल्या वर्षी स्वत:च्या निर्मिती संस्थेची स्थापना केली. ‘मणिकर्णिका फिल्म्स’असं तिच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. 

मुंबईच्या पाली हिल याठिकाणी तिचं आलिशान ऑफिस आहे. या ऑफिसचा व्हिडिओ तिने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. सेलिब्रिटी डिझायनर शबनम गुप्ताने कंगनाच्या या ऑफिसचं इंटेरिअर डिझायनिंग केलं आहे. पर्यावरणाची काळजी घेत हे ऑफिस पूर्णपणे प्लास्टिकमुक्त आहे. 

पिंकविलाने दिलेल्या वृत्तनुसार कंगनाला हे ऑफिस साकारण्यासाठी तब्बल ४८ कोटी रूपयांचा खर्च आला आहे. तिच्या स्वप्नातल्या ऑफिसची जबाबदारी तिचा भाऊ अक्षितच्या खांद्यावर आहे. कंगना रानौतच्या टीमने तिच्या ऑफिसचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.