मुंबई : तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमातून दयाबेन हे पात्र घरा-घरात पोहचलं. मात्र गेल्या वर्षांपासून प्रेक्षक या पात्राला शोमध्ये पाहण्यासाठी आतुर आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे पात्र शोमधून गायब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दयाबेन हे पात्र मालिकेत दाखवलं जात नाहीये. याआधी ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने साकारली आणि ही भूमिका प्रचंड गाजलीही. मात्र प्रेग्नंसी रजेनंतर ती या शोमध्ये परतलीच नाही. अभिनेत्रीच्या प्रेग्नंसीनंतर ती या मालिकेत पुन्हा परतणार असल्याचं बऱ्याचदा बोललं गेलं मात्र ती या शोमध्ये परतलीच नाही. दिशाने शो सोडल्यानंतर तिने तिच्या मुलाकडे लक्ष केंद्रित केलं.
मात्र आजही या पात्राला या शोमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चाहते दयाबेनच्या शोमध्ये परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तारक मेहता शोमध्ये मिसेस सोधीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. समोर आलेल्या व्हिडीओत अभिनेत्री दयाबेन संबधित एक सिक्रेट सांगताना दिसत आहे. यावेळी बोलताना अभिनेत्रीने सांगितलं की, गेल्या तीन वर्षांपासून निर्माते या भूमिकेसाठी एका मुलीचं ऑडिशन घेत आहेत.
28 वर्षाच्या मुलीचं घेतलं ऑडिशन
व्हायरल व्हिडीओमध्ये जेनिफर बोलत आहे की, ती 100% दयाबेन आहे. निर्माते गेल्या तीन वर्षांपासून एका गरीब मुलीचं ऑडिशन घेतायेत. दिल्लीहून त्या मुलीला सर बोलावतात. एक गोष्ट म्हणजे ती मुलगी खूप लहान आहे. ती 28-29 वर्षांची आहे. वयात खूप अंतर दिसेल, म्हणूनच हे वर्क होत नाहीये. पण ती सेम टू सेम दया आहे. तिच्यासोबत आम्ही मॉक टेस्टही शूट केली. दिलीप जी, टपू सेना या सर्वांचे वेगवेगळे मॉक शूट होते. त्या मुलीचा चेहरा वेगळा आहे, पण तिची तयारी केली आणि जर तुम्ही डोळे बंद केले तर फरक सांगता येणार नाही.
शोचे मेकर असित मोदी म्हणाले की, ते नव्या दयाबेनच्या शोधात आहेत. ते लवकरच दयाबेनच्या भूमिकेसाठी कोणालातरी कास्ट करणार आहेत आणि लवकरात लवकर ते दयाबेन हे पात्र शोमध्ये पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला घेवून येणार आहेत. त्यामुळे आता या शोमध्ये कोणती अभिनेत्री दयाबेनच्या भूमिकेत येते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.